महसूल देणार दलालांना दणका

नगर : मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड यांनी हल्ल्याविरोधात न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्णय महसूलच्या बैठकीत बोलावून दाखविल्याबरोबर त्यांच्या निर्णयाला समर्थन म्हणून वरिष्ठांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

हल्लेखोर दलालांविरोधात न्यायालयीन लढाईचा निर्धार

दलालांसमोर अडचणी वाढणार

महसूल कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या दलालांची यादी तयार करण्यात येणार आहे. या बैठकीत त्याअनुषंगानेही चर्चा झाल्याचे समजते. जिल्हाभरातील दलालांची ही यादी असणार आहे. ही यादी प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. यादी तयार झाल्यास दलालांसमोर अडचणी वाढणार आहेत.

नगर – जिल्हा प्रशासनातील महसूल अधिकारी काही महिन्यांपासून दलाल आणि वाळू चोरांच्या हल्ल्यांमुळे त्रस्थ आहे. दलालांनी तर कहरच केला आहे. महसूल अधिकाऱ्यांवर दलाल हल्ले करू लागले आहेत. समाज माध्यमांवर बदनामी होईल, अशी टिपणी करण्यापर्यंत त्यांचे धाडस पोहचले आहे. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज या मुद्यावर बैठक घेत विचारमंथन केले. यात दलालांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करून त्याविरोधात न्यायालयीन लढाईचा निर्धार व्यक्त केला. महसूल विभाग दलालमुक्त करण्याचा निर्धार या बैठकीत अधिकाऱ्यांनी बोलावून दाखविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रातांधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर श्रीगोंदे तेथे वाळू चोरांनी कुऱ्हाडीने हल्ला केला. पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल होईल, देखील यात पोलिसांनी बोटचेपी भूमिका घेत तपास केला. ही घटना ताजी असतानाच नगरमधील नागापूरचे मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड यांच्यावर देखील एका दलालाने हल्ला केला. पोलिसांच्या जवळ असलेल्या या दलालाला अटक झाली नाही. शेवटी त्याला न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला. हे दोन्ही प्रकरणे थोडी होती की, काय तेवढ्यात महसूल विभागातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समाज माध्यमांवर बदनामी होईल असा मजकूर एका दलालाने झळकविला.

तक्रारीसाठी पोहचलेल्या महिला अधिकाऱ्यांना पोलिसांनी ठाण्यात सुमारे सहा तास बसवून ठेवले. तरीही तक्रार दाखल केली नाही. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसाठी आणि शांततेसाठी महसूल आणि पोलीस दलाची एकमेकांना अशी पूरक भूमिका गरजेची आहे. परंतु गेल्या नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महसूलला पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याचे पडसाद या बैठकीत चांगलेच उमटले.

मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. श्रीनिवास यांनी या दलालाविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार बैठकीत बोलावून दाखविला. महसूल अधिकाऱ्यांनी या निर्णयाचे बैठकीत स्वागत केले. या लढ्याला महसूल विभागाकडून संपूर्ण सहकार्य आव्हाड यांना देण्यात येईल, असा निर्णय झाला. इतर गुन्ह्यांचा देखील पाठपुरावा करण्यावर शिक्कामोर्तब झाले. विशेष म्हणजे, महसूल अधिकाऱ्यांवर दलालांकडून हल्ले होत आहे. या दलालांची कामे न करण्याबरोबरच जिल्ह्यातील महसूल विभाग दलालमुक्त करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. अतिरीक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, प्रातांधिकारी गोविंद दाणेज आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)