महिला अधिकाऱ्याच्या बदनामीचे कटकारस्थान

गुन्ह्यासाठी महिला अधिकारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसून

नगर  – जिल्हा प्रशासनात उच्च पदावर कार्यरत असलेल्या आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला अधिकाऱ्याची बदनामी होईल असा मजकूर फेसबुक समाजकंटकांनी टाकला आहे. याविषयी तक्रार देण्यासाठी महसूल विभागाचे नगरमधील निम्मे अधिकारी कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत होते. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी संबंधित महिला अधिकाऱ्याची समजूत काढण्यावर भर दिल्याचे समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसापूर्वी या महिला अधिकाऱ्याने दुचाकीवर स्वार होऊन नगर तालुक्‍यातील अवैध वाळूसाठ्यांवर छापे घातले होते. महिला अधिकाऱ्याने केलेली ही धडक कारवाई राज्यात पहिलीच आणि कौतुकाला पात्र ठरली. या कारवाईचे महसूल प्रशासनासह मंत्रालयाने देखील कौतुक केले. मात्र या कारवाईने वाळू चोरांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे धाबे दणाणले. कारवाईमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यातून दुखावलेल्यांनी या महिला अधिकाऱ्याची आणि महसूल प्रशासनाची बदनामी होईल, असे कटकारस्थान करून आज बदनामी होईल, असा मजकूर फेसबुकवर व्हायरल केला. या प्रकाराने ही महिला अधिकारी डगमगली नाही आणि तिने माघार देखील घेतली नाही.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन या महिला अधिकाऱ्याने फेसबुकवर व्हायरल झालेला प्रकार सांगितला आहे. वरिष्ठांचे आदेश घेत ही महिला अधिकारी हिने कोतवाली पोलीस ठाणे गाठले आणि तिथे तक्रार मांडली. महिला अधिकाऱ्याच्या पाठिशी नगरमधील महसूल अधिकाऱ्यांनी खंबीरपणे उभे राहिले आहेत. विशेष करून यात महिला अधिकारी पुढे होत्या. त्या रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसून होत्या. गुन्हे दाखल करण्याच्या मुद्यावर या महिला अधिकारी ठाम होत्या. सायंकाळी चार वाजल्यापासून या महिला अधिकारी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आहेत. परंतु पोलिसांनी थांबा, पाहू, करतो या व्यक्तिरीक्त त्यांच्यापुढे कार्यवाही करण्याची कोणतीच भूमिका रात्री नऊ वाजेपर्यंत घेतली नाही आणि जाहीर केली नाही.

कोतवाली पोलीस ठाण्यात महिला अधिकारी व त्यांच्याबरोबरच्या महिला सहकारी पाच तास बसून होत्या. पोलीस मात्र व्हायरल झालेला मजकूर पाहून अभ्यास करत होते. गुन्हा दाखल होणार नाही, असा हा मजकूर असल्याचे आपआपसात बोलत होते. हा प्रकार पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत रंगला होता. महिला अधिकारी मात्र गुन्हा दाखल करण्यावर ठाम होती. याबाबत महिला अधिकारी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहून पोलीस देत असलेल्या वागणुकीविषय सांगत होती. वरिष्ठ देखील त्या महिला अधिकाऱ्याबरोबर असलेल्या इतर महिला अधिकायांकडून पोलीस देत असलेल्या वागणुकीची माहिती घेत होते. गुन्हा दाखल करायची की, नाही यावर रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलिसांची भूमिका अस्पष्ट होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)