महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आंदोलन छेडणार- बोडखे

अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा शासन निर्णय रद्द करा

नगर – नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा दि.31 ऑक्‍टोंबर 2005 चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षक परिषदेचे वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दिल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली. जुनी पेन्शन योजना मिळणे ही सर्वच शिक्षकांची न्याय हक्काची मागणी असून, हा प्रश्‍न शासन स्तरावर न सुटल्यास शिक्षक परिषदेच्या माध्यमातून राज्यपातळीवर आंदोलन छेडण्याचा इशारा बोडखे यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासन सेवेत दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या निवृत्तीवेतन योजने ऐवजी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे. या योजनेला विहार दुर्वे व इतर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ही जनहित याचिका उच्च न्यायालयाने दि.11 ऑगस्ट 2017 रोजी निकाली काढून राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करता येणार नसल्याचा आदेश दिला.

या आदेशाविरुद्ध शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल करून आव्हान दिले आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी स्थगिती देण्याची विनंती केली. तथापि सर्वोच्च न्यायालयाने आदेशाची अंमलबजावणी स्थगिती दिली नाही व रिट याचिका सर्वोच्च न्यायालयाने दि.27 मार्च 2018 रोजी विशेष अनुमती याचिका निकाली काढून उच्च न्यायालय मुंबई यांनी दि.11 ऑगस्ट 2017 रोजी दिलेला आदेश कायम केला.

यामुळे शासनाने राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकार या नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू नसल्याचा आदेश निर्गमित केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर दि.31 ऑक्‍टोबर 2005 चा शासन निर्णय रद्द करणे अत्यावश्‍यक असल्याचे स्पष्ट करीत, नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा शासन निर्णय रद्द घोषित करावे. तसेच राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ पूर्ववत मिळवून देण्याची मागणी करण्यात संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)