कोपरगाव येथे कबड्डी स्पर्धेला सुरूवात

file photo

कोपरगाव  – तालुका क्रीडा संकुलात 14 ते 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या स्पर्धेसाठी तालुक्‍यातील 55 शाळांतील 500 खेळाडू सहभागी झाले आहेत.

प्रांरभी जिल्हा शारिरीक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष अरूण चंद्रे, कोपरगाव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष अशोक कांगणे, दत्ता देवकर, उपाध्यक्ष सुधाकर निलख शिवराज पाळणे, सचिव संतोष ठाणगे यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांबद्दल माहिती दिली. कोपरगाव तालुका क्रीडा संकुल समितीचे सचिव राजेंद्र पाटणकर यांनी प्रास्तविक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदार कोल्हे म्हणाल्या की, तालुका क्रीडा संकुलात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून गेल्या दहा वर्षापासून विविध तालुकास्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले जाते. नुकत्याच जकार्ता येथील आशियाई कबड्डी स्पर्धेत कर्णधार पायल चौधरी व सोनाली शिंगटे यांच्या चढाईच्या जोरावर अंतिम स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. खेळाडूंचा आदर्श ग्रामीण भागातील स्पर्धकांनी घ्यावा. या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या खेळाडूंची जिल्हा पातळीसाठी निवड होणार असल्याने सर्वांनी सांघीक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी कॅप्टन अशोक थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, बाजीराव शिंदे, रवि देशमुख, उत्तमराव चरमळ, संजीवनीचे संचालक प्रदीप नवले, निकुंभ, संजीवनी इंग्लिश मीडिअम स्कूलचे प्राचार्य बी. व्ही. जाधव, धनंजय देवकर, संजय आमोलीक, गायकवाड, महाले, बाळासाहेब बडजाते, अजित पवार, रेडडी, अनुप गीते, यांच्यासह विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)