कोपरगावात आठ तास चालली मिरवणूक

कोपरगाव – ढोल-ताशांचा निनाद…सोबतीला बॅंडपथके…पारंपरिक वाद्यांचा गजर…. भगवे ध्वज… आकर्षक वेशभूषा…गुलालाची मुक्त उधळण हे कोपरगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे वैश्‍ष्ठ्य होते.

शिवाजी पुतळ्यासमोर नगरपालिकेने स्वागत कक्ष उभारला होता. तेथे नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपनाराध्यक्ष विजय वाजे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगरसेवकांनी गणपती मंडळांचे स्वागत केले. या वर्षी 35 गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला. रात्री 11 वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युवानेते विवेक कोल्हे, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांसह नगरसेवकांनी मिरवणुकीत हजेरी लावली. या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने व गोदावरी नदीला अत्यल्प पाणी असल्याने फारसा उत्साह जाणवला नाही. गर्दी ही बेताचीच होती. नगरपालिकेने लहान पुलानजीक मोठे दोन खड्डे घेऊन तेथे विसर्जनाची सोय केली होती. अनेकांनी कुंभारी, हिंगणी बंधाऱ्यात श्रींचे विसर्जन केले.

क्रांती युवक मंडळाचे लेक वाचवा, लेक शिकवा,कोपरगाव नगरपालिकेच्या मंडळाने स्वच्छता अभियान तर टिळकनगर चौक, बजरंग चौक, माता वैष्णव ीदेवी मंडळ यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य यावर भर दिला. न्यायालयाचा आदेश असल्याने या वर्षी डीजेमुक्त गणपती मिरवणूक पार पडली. मंडळांनी पारंपारिक वाद्य, बॅंड पथकावर भर दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)