कोपरगावात जागरण गोंधळ, मोर्चा

धनगर समाजाचे विविध मागण्यांसाठी आंदोलन : तहसीलदारांना निवेदन

कोपरगाव – तालुका धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती व धनगर समाजाच्या वतीने मेंढ्यांसह पारंपरिक पद्धतीने जागरण गोंधळ करण्यात आला. शहरातील खंडोबा मंदिरापासून मोर्चा काढत आरक्षणासह इतरही मागण्यांचे निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील ग्रामीण भागासह शहरातील धनगर समाजातील बांधवानी शुक्रवारी सकाळी शहरातून मोर्चा काढला होता. या मोर्चात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी विजय वहाडणे, शरद खरात, संजय कांबळे, प्रकाश करडे, शिवाजी कवडे, दीपक कांदळकर, योगेश नरोडे, रमेश टिक्‍कल, राजेंद्र टिक्‍कल, बापूसाहेब शिंदे, शिवाजीराव शेंडगे, ज्ञानेश्‍वीर गोंधळे, प्रभाकर शिंदे, सचिन कोळपे यांच्यासह समाज बांधवाची भाषणे झाली. यावेळी विविध संघटनाच्या वतीने धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला.

निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीच्या सवलती तत्काळ लागू कराव्यात, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे नाव द्यावे, काळानुरूप बंद पडत असलेल्या मेंढ्या चारण्याच्या व्यवसायाला राखीव कुरण मिळावे, आंदोलनांमधील धनगर आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घेणे, आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या धनगर बांधवांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर प्रभाकर शिंदे, राजेंद्र नावडकर, किरण थोरात, सचिन कोळपे, जालिंदर चितळकर, विलास कोळपे, बाबासाहेब पानसरे, अशोक काकडे, आशीष वाघमारे, पंकज जाधव, अशोक मतकर, दत्तात्रय बढे, गणेश करडे, नंदू बडे, जालिंदर शेळके, भाऊसाहेब शेळके, ज्ञानेश्‍वर कोळपे, आशीष वाघमारे, शिवाजीराव शेंडगे, ज्ञानेश्‍वर गोंधळे यांच्यासह समाज बांधवांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)