प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

सुरेगाव शिवारातील घटना : दोघा आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

कोपरगाव  – अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना सुरेगाव (ता. कोपरगाव) शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, या बाबतची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनिल बाबासाहेब घुसळे (वय 36, रा. सुरेगाव, ता. कोपरगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बाळू दिलीप खंडवे (वय 26) व विलास पुंजाराम कुवारे (वय 41, दोघे रा. सुरेगाव) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. या बाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रमा अनिल घुसळे व बाळू खंडवे या दोघांचे अनैतिक संबंध होते. त्या संबंधास मृत पती अनिल बाबासाहेब घुसळे याचा विरोध होता.

त्यामुळे रमाच्या सांगण्यावरून बाळू खंडवे, विलास कुवारे या दोघांनी दि.25 रोजी रात्री 9 वाजता अनिल घुसळे याला बोलावून त्याचा कशाने तरी गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह अर्जुन शेळके (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) यांच्या सुरेगाव शिवारातील शेतातील विहिरीच्या पाण्यात टाकून दिले अशी फिर्याद सासू विमल घुसळे यांनी दिली.

पोलिसांनी दोघांना शिताफीने अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. कोपरगाव न्यायालयाने त्यांना 7 दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक फौजदार अशोक कुसळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप काशीद, विजय पाटील, असीर सय्यद आदींनी तातडीने सुरेगाव, कोळपेवाडी भागात शोध घेवून खंडवे व कुवारे या दोघांना अटक केली.

कोळपवाडी दरोड्यातील धागेदोरे सापडेनात…

कोळपेवाडी परिसरात ऐन आठवडे बाजाराच्या दिवशी दि.19 ऑगस्ट रोजी भरपेठेत 14 ते 20 जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. 28 लाख रूपयांची लूट करीत श्‍याम घाडगे यांच्यावर गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला 11 दिवस उलटूनही अद्याप तपास लागलेला नाही. त्यातच ही खुनाची घटना घडल्याने कोळपेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)