सीमेवरचा जवानच खरा देशभक्‍त – सानप महाराज

मुंगूसगावच्या हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

कोळगाव – सीमेवरचा जवान हाच देशाचा खरा देश भक्‍तआहे, असे प्रतिपादन भागवताचार्य सोपान सानप महाराज (हिंगोली) यांनी केले. श्रीगोंदे तालुक्‍यीातल मुंगूसगाव येथे आयोजित 36 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाच्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी श्रीगोंदे पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम लगड, शिवसेना नेते घनश्‍याम शेलार, सरपंच रामदास कानगुडे, राजाराम जठार, दादासाहेब ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सानप महाराज म्हणाले की, आध्यात्माने मनाचे शुद्धीकरण होते. आध्यात्मिक संस्कृतीला जपणे अत्यावश्‍यक आहे. त्याचबरोबर देशप्रेमही महत्त्वाचे आहे. धर्माचे रक्षण करणे आपले कर्त्यव्य आहे, तर देशाचे रक्षण करणे आपले परमकर्त्यव्य आहे. स्वधर्माचे पालन केले पाहिजे, असे आवाहन केले.

मुंगूसगाव, विसापूर, सुरेगाव परिसरातून भाविकांनी हजेरी लावून सुश्राव्य प्रवचनाचा लाभ घेतला. या वेळी बाळकृष्ण महाराज (आळंदी), बंडोपंत खामकर (आळंदी), श्रीराम महाराज (आळंदी) यांनी कीर्तनात महाराजांना साथ देत भाविकांच्या मनाचा ठाव घेतला. या वेळीभाविकांना लापशी, भात, सांबर महाप्रसाद वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी उपसरपंच विलास टकले, विजय जठार, दत्ता धुमाळ, महेश म्हस्के, नीलेश कानगुडे, तात्याभाऊ भोसले, हनुमान मित्र मंडळ व ग्रमस्थांनी परिश्रम घेतले.

“मुंगूसगावला सैनिकांचा वारसा स्वातंत्र्य काळापासून लाभला आहे. 1965 च्या युद्धात बबन बाबाजी जठार हे शहीद झाले. तर गावातील प्रत्येक घरातील माणूस सैन्यात आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
-घनश्‍याम शेलार ,शिवसेना नेते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)