अ. भा. किसान सभेचे शनिवारी देशव्यापी धरणे

हमीभाव ,अन्य मागण्यांसाठी देशभरातील 400 ठिकाणी आंदोलन

नगर – अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शनिवार दि.1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राज्यसहसचिव ऍड.कॉ. बन्सी सातपुते व जिल्ह्याध्यक्ष एल.एम.डांगे यांनी दिली. हे आंदोलन देशव्यापी असून देशभरातील 400 ठिकाणी केले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत आला आहे. शेतकरी वर्गाला सरकारच्या धोरणामुळे कुठलेही स्थान राहिलेले नाही. शेतकऱ्यांसाठी योजिलेला योजना कुचकामी ठरत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मध्ये दररोज वाढ होत आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2016-17 या वर्षांमध्ये 2 लाख 46 हजार 260 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता सदर विमा 2 लाख 23 हेक्‍टरसाठी हा विमा घेऊन 577 कोटी रुपयांची विमा रक्कम संरक्षित केली होती व जवळ जवळ 100 कोटी रुपये विमा जमा केला होता.

त्या पैकी विमा कंपन्यांनी फक्त 41 हजार 850 शेतकऱ्यांना 20 कोटीच्या आसपास नुकसान भरपाई दिली . एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढत असताना विमा कंपन्या मात्र 10 हजार कोटींची नफा कमावला आहे. हे सर्व शासनाने नुकसान भरपाईचे निकष शेतकरी हित केंद्र स्थानी ठेवण्या ऐवजी विमा कंपन्यांना पूरक होतील अशी केल्या मुळे झालेलं आहे.

नगरजिल्हा मध्ये 2017 पर्यंत दुष्काळी गावांची संख्या 582 होती ती 28 फेब्रुवारी च्या शासन निर्णयाने 8 वर आणलेली आहे. कर्जमाफी योजनेचा संपुर्ण बोजबारा उडालेला आहे. कर्जदार व्यक्ती घटक मानून कर्ज माफी देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत पर्यंत झाली नाही. उलटपक्षी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या नावाखाली जवळ जवळ 5 कोटी रुपयाची चाट शेतकऱ्यांना बसली आहे.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे. वर्ग 2 च्या जमिनीवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सक्तीने विमा भरपाई मिळाली पाहिजे. पिकविमा नुकसान भरपाई चे निकष शेतकरी हित केंद्र स्थानी ठेऊन बदले पाहीजे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या वाया गेलेल्या पिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी. आदिवासी, बिगर आदिवासी यांना वनजमीनेचे पट्टे द्यावेत.

शेती महामंडळाची जमीन खंडकरी शेतकऱ्याला वाटप करून उरलेल्या जमीनीचे अनुसूचित जाती,जमाती, भूमिहीन, शेतकरी, अतिक्रमित शेतकऱ्याला तातडीने वाटप करा. शेतीसाठी आवश्‍यक असणारे शेती अवजारे, खते, औषधे, बी बियाणे, पशुखाद्य व कृषी निविष्ठा जि. एस.टी. मुक्‍त कराव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होणार असून देशातील 400 पेक्षा जास्त जिल्ह्याधिकारी कार्यालयावर हे धरणे आंदोलन होणार आहेत.

तरी या आंदोलनांमध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्याने सामील व्हावे असे आवाहन किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. बापूराव राशीनकर, कॉ. विकास गेरंगे, कॉ. बहिरनाथ वाकळे, कॉ. अप्पासाहेब वाबळे, कॉ. गोरक्षनाथ मोरे, कॉ. लक्ष्मण मोरे, कॉ.कैलास शेळके, कॉ. श्रीधर आदिक, कॉ. अनिल कढणे, कॉ.राम पोटफोडे, कॉ. अशोक दुबे, कॉ. आर.डी. चौधरी, कॉ. सुलाबाई आदमाणे, कॉ. निवृत्ती गायकवाड यांनी केले आहे.

किसानसभेच्या मागण्या

शेती मालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के हमी भाव मिळावा.शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर यांना वयाच्या 60 वर्षा नंतर दरमहा 10 हजार रुपये निवृत्ती मिळावे ,भूसंपादन कायदा 2013 नुसारच भूसंपादन करावे.भूजल अधिनीयम 2018 मधील शेतकरी विरोधी जाचक अटी तातडीने मागे घ्या किंवा हा अधिनियमच मागे घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)