केडगावच्या 624 घरांच्या प्रकल्प उभारण्यासाठी मोजणी सुरु

केडगाव येथील घरकुल प्रकल्पाच्या मोजणी कामाला सुरूवात झाली.(छायाः धनेश कटारिया)

नगर – महापालिकेच्या वतीने केडगाव भागातील दुधसागर सोसायटीजवळ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत भागीदारी तत्वावर उभारण्यात येणाऱ्या 624 घरांच्या प्रकल्पासाठी मोजणी सुरू करण्यात आली आहे. प्रकल्प अभियंता आर.जी.मेहेत्रे यांनी हे काम सुरू केले.नगरसेवक दिलीप सातपुते यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाला चालणार मिळाली आहे.

यावेळी संजय पिलावंत, संजय लोंढे, वसंत शिंदे, रमेश परतानी, अमोल येवले, विजय पठारे, भारत कांडेकर, सुनील सातपुते, संग्राम शेळके, सागर गायकवाड, पप्पू भाले उपस्थित होते. मेहेत्रे म्हणाले, टीडीआरच्या माध्यमातून साडेसहा एकर जागा मिळाली आहे. या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत भागीदारी तत्वावर परवडणारी घरे म्हणजे ए.एच.पी.या माध्यमातून 624 घरांचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. केंद्र शासनाची या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारची नियुक्‍ती केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्लॉट सर्व्हेचे काम सुरु केले आहे. त्यानंतर बांधकाम परवानगी, निविदा असे सोपस्कार पूर्ण करणार आहे. 16 हजार अर्ज आलेले आहेत. त्यापैकी याठिकाणी 624, नालेगावला 216 घरे व भविष्यात पुढे आगरकर मळा येथेही 560 घरांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ही घरे सोडत पद्धतीने दिली जाणार आहे. मार्च किवा एप्रिल मध्ये या प्रकल्पाला सुरुवात होईल.
सातपुते म्हणाले, ज्यांना स्वतःचे घर नाही त्यांना सवलतीच्या दरात घर मिळावे, यासाठी ही योजना आहे.

ही योजना या केडगाव परिसरात होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी प्राप्त केली आहे. कारण या भागातील ज्या लोकांना स्वतःचे घर नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यांना या केंद्र शासनाच्या योजनेच्या लाभ झाला पाहिजे. 56 कोटीच्या हा जी प्लस टू प्रकल्प बांधण्यात येणार असून प्रत्येक लाभार्थीला 2 लाख 50 हजार सरकार देणार आहे तसेच सर्व मुलभूत सुविधा देण्यात येणार आहे. असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)