केडगावमध्ये साथीच्या आजारांचे थैमान

राष्ट्रवादी कॉंग्रेसची उपाययोजनांची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

नगर – केडगाव व उपनगर परिसरात मोठ्या संख्येने नागरीवसाहती आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाच्या कुठल्याही उपाययोजना नसल्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे साथीच्या रोगांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांना डेंग्यू, गोचीड ताप व मलेरिया या साथीच्या रोगाने पछाडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केडगावमधील सर्व दवाखान्यांमध्ये रुग्णाची गर्दी आहे, तसेच नगर शहरात व पुण्यालाही काही रुग्ण उपचार घेत आहेत. सध्याच्या परिस्थितीत सुमारे 50 जण दवाखान्यात दाखल झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केडगाव परिसरात डेंग्यू, गोचीड ताप, मलेरिया या साथीच्या रोगाने थैमान घातले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याचे योग्य ते निवारण करावे, याकडे लक्ष वेधण्यासाठी मागणीचे निवेदन उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष मनोज कोतकर यांनी दिले. यावेळी स्वप्नील साळवे, सोनू कुटे, इंजि. उमेश ठोंबरे, भाऊ शेंडगे, बंटी वीरकर, सौमित्र रासने, तुषार चौधरी, वर्धमान घोडके, परशुराम मादर, वैभव सुंबे आदी उपस्थित होते.

महापालिकेने याकडे लक्ष देऊन स्वच्छतेचे काम आटोक्‍यात आणण्याचा प्रयतक्‍ करावा. महापालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी पाठवून उघड्या नाल्या, दुर्गंधीयुक्त साचलेले पाणी, डबके, तुंबलेल्या गटारी यांची स्वच्छता व औषधी व पावडरची फवारणी करून डासांना नियंत्रणात आणावे. जर या उपाययोजना केल्या नाहीत, तर रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. महापालिकेचे काम नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याचे आहे. परंतु नगर महापालिकेने अक्षरश केडगावकडे कुठल्याही सुविधा देत नसल्यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे.

कोणीही अधिकारी व कर्मचारी काम सांगितल्यानंतर ते वेळेवर करीत नाहीत. कायनेटिक चौक, दौंड रोड परिसर, रेल्वे ब्रीज, केडगाव, अरणगाव रोड परिसरातील नागरिकांची आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने उपायुक्त यांनी याबाबत लक्ष घालावे. आरोग्य विभागास योग्य त्या सूचना देऊन तातडीने पावले उचलावीत, अन्यथा 8 ते 10 दिवसांत कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व परिसरातील नागरिकांच्या वतीने कुठलीही पूर्व सूचना न देता आंदोलन छेडण्याचा इशारा मनोज कोतकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)