सिद्धटेकला पावणेचारशे कोटींचा वीज प्रकल्प

कर्जत – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील कर्जत तालुक्‍यात विकासकामांचा धडाका लावला आहे. तालुक्‍यातील रस्ते, पाणीपुरवठा, कुकडी प्रकल्प, तुकाई चारी, कर्जतचा पाणी प्रश्न, माळढोक आरक्षण अशा कित्येक प्रश्नांना त्यांनी न्याय दिला. त्यांच्या विकासाच्या दृष्टीमुळे कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारसंघात आला. प्रा. शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार आणि सिद्धटेक येथे मंजूर असलेल्या पावणे चारशे कोटी रुपयांच्या वीज प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर यांनी दिली.

सिध्दटेक-बेर्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत पावणे चारशे कोटी रूपये खर्चातून 400 मेगावॅटच्या विद्युत प्रकल्पाची उभारणी होणार आहे.यातून तीन जिल्ह्यांना विजेचा पुरवठा केला जाणार आहे.पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नातुन कर्जत तालुक्‍यासाठी रस्त्यांसाठी 10 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर झाला.अनेक दशके तालुक्‍यातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती झाली नसल्याने बिकट स्थिती निर्माण झाली होती.आता रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण कामे होत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या 3978 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंत्रीमंडळाने नुकतीच मंजुरी दिली.या क्रांतीकारी निर्णयामुळे कुकडी प्रकल्पाचा डावा कालवा क्षेत्रातील कर्जत तालुक्‍यातील अवर्षणप्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.दिघी,तुकाई व बिटकेवाडी या योजनांसाठी पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

याबरोबरच तालुक्‍यातील तीर्थक्षेत्रांचा विकास,अशा विविध विकास कामांमुळे तालुक्‍याच्या विकासाला चालना मिळाली असून तालुक्‍याचा चेहरामोहराच बदलत आहे. पालकमंत्र्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला जाणार असल्याचे कोपनर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)