कर्जतमध्ये आंदोलन

कर्जत – आदिवासी धनगर समाज आरक्षण समिती यांच्या वतीने धनगर आरक्षण मागणीसाठी कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल तीन तास “रास्ता रोको’ करण्यात आला. सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असे म्हणून चार वर्षे झाली तरी अद्याप आरक्षण मिळाले नाही, त्यामुळे नेते, कार्यतकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

अहल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे म्हणाले की, धनगर समाज हा भोळाभाबडा आणि भटकंती करणारा समाज आहे, जर आरक्षण नाही दिले तर सरकारला भटकायला लावल्याशिवाय शिवाय राहणार नाही. डॉ. इंद्रकुमार भिसे म्हणाले की, प्रा. राम शिंदे यांनी सूडबुद्धीचे राजकारण करून आमच्या वर खोटे गुन्हे दाखल केले. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सरकारवर टीका करत आपला पाठिंबा जाहीर केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेस नेते बाळासाहेब साळुंखे म्हणाले, ज्या समाजाच्या जीवावर पालकमंत्री निवडून आले त्या समाजाची फसवणूक त्यांनी केली. त्यांना आरक्षणाचा विसर पडला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास शेवाळे, माजी जि. प. सदस्य प्रवीण घुले, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा सोनमाळी, डॉ. कैलास हजारे यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मलठणचे सरपंच झुंबर भिसे, युवा नेते गोकुळ इरकर यांची भाषणे झाली. तहसीलदार किरण सावंत यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. प्रास्ताविक माहीजळगाव येथील युवक बापू भीमराव शिंदे यांनी केले. बापू बजागे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)