जिव्हेश्‍वर जन्मोत्सवानिम्मित शहरातून भव्य मिरवणूक

नगर  – स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाच्या वतीने भगवान जिव्हेश्‍वर यांच्या जन्मोत्सव निम्मित नगर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती बागडपट्टीतील मंदिरात अखिल महाराष्ट्र राज्य स्वकुळसाळी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रम पाठक व स्नेहा पाठक याच्या हस्ते पालखी चे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला यामध्ये सजवलेल्या बग्गीत भगवान जिव्हेश्‍वराची प्रतिमा होती सनई चोघडा , घोडेस्वार ,विवध वाद्ये , भजनी मंडळ , लक्ष्मीनारायण शाळांचे विध्यार्थी व शिक्षक यांच्यासह हजारो समाज बांधव सहभागी झाले होते.

मिरवणुकीचे स्वागत विविध ठिकाणी करण्यात आले यामध्ये आ संग्राम जगताप , उपनेते अनिल राठोड, नगरसेविका मालन ढोणे, युवक कॉंग्रेसचे गौरव ढोणे,मनपा सभागृह नेते गणेश कवडे , प्रा. माणिक विधाते यांनी स्वागत करून पूजन केले मिरवणुकीमध्ये , दीपक सूळ , संजय झिंजे , धनंजय जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद धिरडे,कार्याध्यक्ष सतिश झिकरे,सचिव गजेंद्र सोनवणे,खजिनदार अशोक मानकर,शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विक्रम पाठक, उत्सव समितीचे अध्यक्ष व लक्ष्मीनारायण शाळेचे सचिव महेश कांबळे,उत्सव समितीच्या अध्यक्षा वनिता पाटेकर, उमेश कोदे , संजय सागावकर , जितेंद्र लांडगे, कृष्णा बागडे ,सचिन मडके ,सुधाकर अडसूळ यांच्यासह सर्व विश्‍वस्त व कार्यकारणी सदस्य सह मोठया संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालखी मिरवणुक सर्जेपुरा,तेलीखूट चितळेरोड,दिल्लीगेट तोफखाना मार्गे परत मंदिरात आली यावेळी पालखीची महाआरती टॅक्‍स सल्लागार स्वाती व नरेंद्र बागडे या दांपत्याच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम नगरसेवक विक्रम राठोड, संजय शेंडगे, सचिन जाधव , अरुण तरोटे, अविनाश पावले , सुरेश इंगळे ,संजय दळवी ,चंद्रकांत मानकर, योगेश भागवत, छाया साळी ,सुरेखा शेकटकर,शुभदा वल्ली,प्रा अनुराधा मिसाळ , सुनील पावले याच्यासह मोठ्या संखेने समाज बंधू भगिनी उपस्थित होते नंतर महाप्रसादाने सांगता झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)