चोरी 50 हजाराची, फिर्यादीमध्ये मात्र 50 लाख?

फिर्यादीही आवक; जामखेड पोलीस ठाण्याचा सावळा कारभार

जामखेड – दोन दिवसांपूर्वी जामखेड शहरातील एच.यु.गुगळे फर्मच्या नगर रस्त्यावरील आयकॉन रेसीडेन्सी अपार्टमेंट व परिसरातील तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या. याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या घरफोडी फिर्यादीत 5 तोळे सोन्याच्या दागिण्यांसह दोन हजार रुपये रोख चोरीस गेल्याचे म्हटले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामुळे फिर्यादीमध्ये सोन्याच्या दागिन्यांची किंमत 48 हजार असताना जामखेड पोलीस ठाण्याच्या ऑनलाईन फिर्यादीमध्ये मात्र, तब्बल 48 लाख, व रोख 2 हजार रुपये असतांना ती 2 लाख चोरी गेल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 50 लाख रुपयांची चोरी झाल्याचे दिसून आले. पोलीस ठाण्याचा हा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सारवारसारव करून ही प्रिंट मिस्टेक असल्याचे सांगितले.

जामखेड बसस्थानक परिसरात असलेल्या एच. यु. गुगळे फर्मच्या आयकॉन रेसीडेन्सी अपार्टमेंटच्या फ्लॅटमधील चंद्रकांत दत्तात्रय ढवळे यांच्या घरातून दि.24 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास बंद दरवाजाचे कुलूप भरदिवसा तोडून घरातील कपाटात ठेवलेले 5 तोळे सोन्याचे दागिने व रोख 2 हजार चोरून नेले. याबाबत चंद्रकांत ढवळे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फियार्द दिली. यावेळी कच्च्या फिर्यादीमध्ये 48 हजाराचे सोने व 2 हजार रुपये रोख चोरीस गेल्याचे म्हटले होते. मात्र, ऑनलाईन फिर्याद दाखल करताना संबधित पोलीस कर्मचाऱ्याकडून टाईप करतांना चोरी झालेल्या 5 तोळे सोन्याच्या दागिन्यांची किंमत 48 हजार ऐवजी 48 लाख तर रोख रक्‍कम 2 हजार ऐवजी 2 लाख रुपये करण्यात आली. असे एकुण 50 हजार लिहिण्याऐवजी 50 लाख लिहिले गेले. यामुळे फिर्यादी देखील आवक झाला आहे.

सरकारी मुल्यनुसार 5 तोळे सोन्याचे फक्‍त 50 हजार लावण्यात आले, मात्र बाजार भावाप्रमाणे 5 तोळे सोने हे दीड लाखाच्या आसपास होते तरीही पोलिसांनी फिर्यादीमध्ये 50 हजार मुल्य ठरविण्यात आले. विशेष म्हणजे चार ठिकाणी चुकीची रक्कम लिहिली गेली तरी यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या ठाणे अंमलदार यांच्या ही चुक लक्षात आली नाही.

एफ.आय.आर.मंजूर करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला.तक्रारदार यांनाही याची प्रत देण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पत्रकारांनी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना विचारले असता त्यांनी प्रिंट मिस्टेक असल्याचे सांगून सारवासारव करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)