कलाकेंद्रा विरोधात ग्रामस्थ उतरणार रस्त्यावर

जामखेड – मोहा गावाच्या हद्दीतील कलाकेंद्र हे कलाकेंद्र राहीले नसुन गावगुंडाचे अड्डे बनले आहेत. परिसरात अवैध धंदे वाढले असुन गुन्हेगारीमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील कलाकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात यावीत, यासाठी रेडेवाडी व मोहा येथील ग्रामस्थ कलाकेंद्रा विरोधात रस्त्यावर उतरणार असुन दि. 6 आक्‍टोंबर रोजी जामखेड- बीड रस्त्यावर “रास्ता-रोको’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे कलाकेंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

मोहा व रेडेवाडी परिसरातील असलेल्या पाच कलाकेंद्रामुळे परिसरात अवैध धंदे व गुंडांचे अड्डे बनले आहेत. तसेच येथील कलाकेंद्रापासून दोनशे मीटर अंतरावर शाळा असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोठा त्रास होतो. याबाबत 2017 च्या ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये देखील कलाकेंद्र बंद करण्यासाठी ठराव झाला. मात्र, अद्यापही ही कलाकेंद्रे बंद झाली नाहीत. त्यानंतर पुन्हा चार महिन्यांपुर्वी म्हणजे दि 6 जुन 2018 रोजी देखील मोहा ग्रामपंचायतीने विषेश ग्रामसभा बोलवली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. त्यावेळी बीड रस्त्यावरील पाचही कलाकेंद्र बंद करण्यासाठी ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखी हात उंचावून ठराव पारीत केला. यानंतर ग्रामविस्तार अधिकारी बी. के. माने यांनी देखील सांगितले होते की, ग्रामसभेचा ठरावाचा अहवाल वरीष्ठांना पाठवण्यात येणार असुन त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

मात्र अद्याप प्रशासनाने कसलाही कारवाई केली नसल्याने अखेर रेडेवाडी व मोहा ग्रामस्थांच्या वतीने बीड रस्त्यावरील सर्व कलाकेंद्र ही दि. 5 आक्‍टोंबरपर्यंत कायमस्वरूपी बंद करण्यात आले नाही तर दि. 6 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता जामखेड – बीड रस्त्यावरील मोहा या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

निवेदनावर सरपंच शिवाजी डोंगरे, शिवाजी डोंगरे, ग्रा.प.सदस्य अशोक रेडे, भिमराव कापसे, किसन घुमरे, धनंजय घुमरे, संजय डोके, अजित रेडे, मल्हारी रेडे, बाळु रेडे, युवराज घुमरे, सुनिल रेडे यांच्यासह दिडशे ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)