आठ जणांवर दरोडाप्रकरणी  गुन्हा

जामखेड – विंचरणा नदीपात्रातून अवैध वाळु उपसा करण्यास विरोध केल्यामुळे तालुक्‍यातील पिंपरखेड येथील ओमासे वस्तीवरील लबडे यांच्या घरी दरोडा टाकून दोन तोळे सोने व पाच हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली आहे. याबाबत पोलीसांनी आठ जणांवर दरोडा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

अजिनाथ पांडुरंग लबडे (वय 34 ओमासे वस्ती रा. पिंपरखेड ता. जामखेड) त्यांच्या राहत्या घराजवळील विचरंणा नदी शेजारील शेताजवळ दोन वर्षा पासुन वाळूचा उपसा करणारे दिंगबर दौलत आढाव, भगवान पोपळे, बापु दत्तु आढाव (सर्व रा.फक्राबाद) यांची व लबडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शनिवारी मध्यरात्री 12.30 सुमारास या तिघांनी वाळू भरणारे अनोळखी पाच मजूर बरोबर घेवून अजिनाथ लबडे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. लबडे यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून जखमी केली तसेच त्यांच्या घरातील सामानाची उचकापाचक करून एक तोळ्याचे गंठण यासह अन्य दोन तोळे सोन्याचे दागिने व पाच हजार रूपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

अजिनाथ लबडे यांच्या मांडीवर व हातावर चाकूने वार करून जबर जखमी केले आहे, असे फिर्याद म्हटले आहे. यावरून पोलिसांनी दरोडा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पो. ना. दिनानाथ पातकळ, पो. कॉ. गहिनीनाथ यादव हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)