राहुरी : कर्ज फेडण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा छळ करण्यात आला. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सानिया सुहास विधाटे (सडे) या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सानिया विधाटे हिचा विवाह सुहास उत्तम विधाटे (रा. लोणी, ता. राहाता) याच्यासोबत झाला होता. लग्न झालेनंतर काही दिवस सासरच्या लोकांनी सानिया हिला चांगली वागणूक दिली. त्यानंतर तुला स्वयंपाक येत नाही. तू आवडत नाही, तू जादूटोणा करते, असे आरोप लावून त्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. पैसे घेऊन येत नाही, तोपर्यत तुला घरात घेणार नाही, असे म्हणून त्यांनी सानिया हिला घरातून हाकलून दिले.
त्यानंतर तिने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सानिया सुहास विधाटे या तरुणीच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात आरोपी पती सुहास उत्तम विधाटे, सासू सुशिला उत्तम विधाटे, नणंद सुनिता उत्तम विधाटे, भाया सुनील उत्तम विधाटे, जाव जयश्री सुनिल विधाटे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.