गॅसच्या भडक्‍यात दोघे जखमी

पाथर्डी – शहरातील जयभवानी चौकातील विजय लाहोटी यांच्या घरात गॅस टाकीचा भडका होऊन दोनजण जखमी झाले. तसेच घरातील वस्तुंचेही मोठे नुकसान झाले. लाहोटी हे शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दुकानातून घरी जेवणासाठी आले होते. घरातील गॅस टाकी संपल्याने ते दुसरी गॅस टाकी लावत होते. अचानक त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर आला.जवळच असलेल्या देवघरातील दिव्यामुळे अचानकपणे भडका झाला.

स्वयंपाक घरात लाहोटी एकटेच होते, त्यांचे दोन्ही हात भाजले गेले. तर त्यांच्या पत्नी शोभा या पलीकडील खोलीत असल्याने त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. घरातील फ्रिज,फर्नीचर व इतर सामान जळाले असून आगीच्या भडक्‍याने घराच्या भिंती काळ्या पडल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घटना समजतात आसपासच्या लोकांनी आरडाओरडा करत पाण्याच्या साह्याने आग विझवली. या घटनेत विजय लाहोटी हे थोडक्‍यात बचावले. या कठीण परिस्थितीतही लाहोटी यांनी गॅस टाकी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. भगवान गॅसचे संचालक अमोल गर्जे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)