शिवसेनेच्या गनिमी काव्याला कायद्याचे उत्तर

नगरच्या सात मंडळांकडून ‘श्रीं’चे गंगामाईत विसर्जन; सावेडीत डीजे वाजविणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा

नगर – बाप्पाच्या निरोपासाठी डीजे वाजविणारच, अशी भूमिका घेणाऱ्या 14 मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याऐवजी त्यातील सात मंडळांनी प्रवरेच्या गंगाईमत “श्रीं’चे विसर्जन केले. शिवसेनेने डीजे वाजविणारच, अशी भूमिका घेतली होती. पोलीस अधीक्षकांनी शिवसेनेला शह देण्यासाठी विसर्जनच्या पूर्वसंध्येलाच डीजे शहरात येऊ नये, अशी नाकाबंदी केली. परंतु शिवसेनेने गमिनी कावा करत अगोदरच डीजे शहरात आणून ठेवला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिरवणुकीसाठी डीजे उभारायला सुरूवात केल्यावर शिवसेना पदाधिकारी व पोलिसांमध्ये चितळे रोडवर चांगली जुंपली होती. पोलिसांची नाकाबंदीची तिरकी चाल शिवसेनेने गमिनी काव्याने उथळून लावली होती. पोलिसांनी शिवसेनेच्या या गमिनी काव्याला कायद्याच्या भाषेत उत्तर देत डीजेला प्रतिबंध करण्यास यश मिळविले. या दरम्यान मात्र सावेडीत डीजेचा आवाज झाला. गणेशभक्तांनी नगर शहरात डीजेमुक्त विसर्जनाचं स्वागत केले. ही परंपरा पुढे देखील सुरू राहिल, अशी भावना व्यक्त करत आपल्या लाडक्‍या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या, अशी आरोळी घालत निरोप दिला.

नीलकमल मित्र मंडळ, नवरत्न तरुण मंडळ, समझोता मित्र मंडळ, शिवशंकर तरुण मंडळ, माळीवाडा तरुण मंडळ, नवजवान तरुण मंडळ, संगम तरुण मंडळ व दोस्ती तरुण मंडळांनी डीजेच्या मुद्यावरून जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मिरवणुकीत सहभागी होणार नाही, अशी शनिवारी रात्री उशिरा भूमिका जाहीर केली. प्रशासनाने या भूमिकेवर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. गणेश मंडळांनी मूर्तीचे विसर्जन न केल्यास धार्मिक भावना दुखविल्याचा गुन्हा नोंदविला जाईल, अशी ताठर भूमिका बोलावून दाखवली. लाडक्‍या बाप्पाच्या निरोपात विघ्न नको म्हणून, मिरवणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेल्या मंडळांनी प्रवरा येथे जाऊन गंगामाईत “श्रीं’च्या मूर्तींचे विसर्जन केले. मंडळाच्या या निर्णयामुळे पहिल्यांदाच नगरमधील गणेशांनी गंगाईत विसर्जन झाले.

शिवसेनेने डीजे वाजविणारच, अशी भूमिका घेतली होती. त्यासाठी शिवसेनेने अगोदरच शहरात डीजे आणून ठेवला होता. मिरवणूक सुरू होताच तो मंगलगेट येथून बाहेर आला. पोलिसांच्या हे लक्षात आल्यावर शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम पाटील यांनी तिथे धाव घेतली. डीजे वाजवून देणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. शिवसेनेने न्यायालयाच्या नियमानुसार डीजे वाजवू, असे पोलिसांना सांगितले. त्यावरही पोलिसांनी विरोध कायम ठेवला.

यावरून पोलीस आणि शिवसेना आमने-सामने आले. शिवसेनेचे संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, अविनाश घुले, दत्ता कावरे यांनी पुढाकार घेत शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पूनम पाटील यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. शिवसेनेने चार बेस लावण्याची मागणी केली. पोलिसांनी फक्त दोनच बेस लावून देऊ, असे सांगितले. त्यामुळे बैठकीत तोडगा निघाली नाही. यावर मिरवणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय मंडळांनी घेत “श्रीं’ना घेऊन प्रवरासंगम गाठले.
दरम्यान, सावेडीत डीजे वाजविणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा पोलिसांनी नोंदविणाला आहे.

प्रवरा येथे “श्रीं’चे विसर्जन केलेली मंडळे

नीलकमल मित्र मंडळ, नवरत्न तरुण मंडळ, समझोता मित्र मंडळ, शिवशंकर तरुण मंडळ, माळीवाडा तरुण मंडळ, नवजवान तरुण मंडळ, संगम तरुण मंडळ व दोस्ती तरुण मंडळ.

नगरमध्ये मिरवणुकीतील सहभागी मंडळे

श्री विशाल गणपती देवस्थान, आदिनाथ तरुण मंडळ, महालक्ष्मी तरुण मंडळ, कपिलेश्‍वर तरुण मंडळ, दोस्ती तरुण मंडळ व आनंद प्रतिष्ठान.

प्रशासनाविरोधात शिवसेना न्यायालयात जाणार

गणेश विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे योग्य त्या डेसिबलपर्यंत डॉल्बी वाजून न देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शिवसेनेचे संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दिली. शिवसेनेच्या मंडळांना जाणिवपूर्वक त्रास देणाऱ्या प्रशासनाविरोधात कार्टात स्वतंत्र याचिका दाखल करणार आहोत, असे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले. राठोड यांनी यावेळी पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचा वापर करत दादागिरी केल्याचा आरोप शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)