फटाका विक्री परवान्यासाठी व्यापाऱ्यांना २२ आॅक्टोबरपर्यंत मुदत

file photo

नगर – दीपावली सणानिमित्त विक्री शोभेची दारु (फटाका) विक्री परवाने घेण्यासाठी परिपूर्ण अर्जासह दिनांक 22 ऑक्‍टोबरपर्यंत संबंधित तालुक्‍याच्या तहसील कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

दीपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्रीसाठी परवाने दिले जातात. त्यासाठीची आवश्‍यक अटी व कागदपत्रांची पूर्तता विक्रेत्यांनी करुन परवाना प्राप्त करुन घ्यावा. परवान्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या अर्जाचा विहित नमुना (फॉर्म नं. ए.ई.-5) संबंधित तालुक्‍याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात उपलब्ध असेल. अर्जास 5 रुपये कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्‍यक आहे. याशिवाय, परवाना शुल्क स्टेट बॅंकेत चलनाने भरुन चलनाची मूळ प्रत अर्जासोबत जोडणे आवश्‍यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परवानाशुल्काचे चलन तहसील कार्यालयाकडून मंजूर करुन घेऊन तालुक्‍याच्या ठिकाणी स्टेट बॅंकेत भरता येईल. ज्या जागेत फटाका स्टॉल उभारावयाचे आहेत, त्या जागेचा नकाशा, त्यावर दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी जागा सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करुन स्वाक्षरीत केलेला नाहरकत दाखला, स्टॉल ग्रामपंचायत हद्दीत असेल तर ग्रामपंचायत दाखला अथवा नगरपालिका हद्द वा महापालिका हद्दीत असेल तर त्यांची शिफारस, छावणी (कॅन्टोन्मेंट) हद्दीत असेल तर छावणी मंडळाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची शिफारस अर्जासोबत आवश्‍यक असेल.

नियोजित जागा वाणिज्य प्रयोजनासाठी बिनशेती असावी. तसे नसल्यास सक्षम अधिकाऱ्यांची तात्पुरती उक्‍त प्रयोजनासाठी बिनशेती परवानगी घेऊन सादर करणे आवश्‍यक आहे. परवानाधारका विरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या प्रकरण 8 नुसार मागील 10 वर्षात गुन्हा दाखल होऊन शिक्षा झाली नसल्याबाबत तसेच अर्जदारास तात्पुरता फटाका परवाना देण्यात यावा किंवा कसे याबाबत सक्षम अधिकारी यांचा स्पष्ट अभिप्रायासह दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्‍यक आहे.

स्फोटक पदार्थांचा नियम2008 प्रमाणे परवाना धारकाने त्यांच्या व्यवसायासंबंधी हिशेब व्यवस्थित ठेवणे आवश्‍यक आहे. याशिवाय, ज्यांना परवाना आवश्‍यक आहे, त्यांनी मागील वर्षांचे परवाना आणि हिशोबाची माहिती अर्जासोबत सादर करणे आवश्‍यक राहणार आहे. सर्व बाबींची पूर्तता करुनच संबंधितांनी आपले अर्ज 22 ऑक्‍टोबरपूर्वी संबंधित तालुक्‍याच्या तहसील कार्यालयात सादर करणे आवश्‍यक आहे. तसेच, त्यांना तेथूनच परवाना दिले जातील, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संबंधित सर्व तहसील कार्यालयांनी अर्जदारांनी सर्व बाबींची पूर्तता केली आहे किंवा नाही, हे पाहूनच परिपूर्ण प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी कार्यालयात सादर करावेत. अपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, तसेच त्याचा विचारही केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)