दिव्यांगाच्या विनयभंग प्रकरणात शेवगावमधील एकाला सक्तमजुरी

60 हजारांच्या दंडापैकी 50 हजार फिर्यादिला देण्याचा आदेश

दिव्यांगाचा जबाबचे चित्रीकरण

या घटनेतील पीडिता ही दिव्यांग आहे. तिचा जबाब भारतीय पुरावा कायदा 199 मधील दुरुस्तीनुसार नोंदविण्यात आला आहे. पाथर्डी येथील मुकबधीर विद्यालयाच्या सहकार्याने दिव्यांगाचा जबाब व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे नोंदविण्यात आला. देशात असे जबाब पहिल्यादांच नोंदविण्यात आल्याची माहिती ऍड. मंगेश दिवाणे यांनी दिली.

नगर  – बालमटाकळीतील अनुसूचित जाती-जमातीमधील दिव्यांग मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मोहन गोविंद धनगुडे (रा. शेवगाव) याला जिल्हा न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार कायद्यातील तरतुदींनुसार पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला. सहायक सरकारी वकील ऍड. मंगेश दिवाणे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिव्यांग मुलीशी 16 जानेवारी 2017 रोजी हा प्रकार झाला होता. दिव्यांग मुलगी घरासमोर काम करत होती. तिला ऐकू व बोलता येत नसल्याचा आरोपीने गैरफायदा घेतला. आरोपीने तिचे तोंड दाबून, उचलून घेऊन तिला घरात घेऊन गेला. त्यावेळी ती ओरडत होती. मुलीचे आजोबा हे मागे गेले असताना त्यांना धक्का देत आरोपी मोहन याने तेथून पळ काढला. शेवगाव पोलीस ठाण्यात मोहनविरुद्ध बाललैगिंग अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदविला.

पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी तपास करत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश नावंदर यांच्यासमोर या घटनेचा खटला चालवला गेला. सहायक सरकारी वकील ऍड. मंगेश दिवाणे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करत सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आरोपी मोहन धनगुडे याला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

याचबरोबर आरोपी मोहन याला न्यायालयाने 60 हजार रुपयांचा दंड केला आहे. या दंडाच्या रकमेतून 50 हजार रुपये फिर्यादीस देण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे. फिर्यादीची मुलगी ही अल्पवयीन असून, या घटनेमुळे त्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून हा आदेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)