दाळमंडईतील व्यापाऱ्याचे साडेचार लाख लांबवले

दुचाकीवरील तिघा चोरांची धाडसी चोरी; भाजप व्यापारी आघाडीने एसपींना निवेदन

नगर – दाळमंडईतून व्यापाऱ्याची साडेचार लाख रुपयांची रोकड तिघा चोरांनी लांबवली. गुरूवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार झाला. हरिकिसन गंगाबिसन मणियार (वय 67) यांच्याबरोबर हा प्रकार झाला. तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हरिकिसन मणियार यांचे मार्केटयार्ड येथे दुकान आहे. दिवसभराची जमलेली रक्कम दाळमंडईतील घरी घेऊ येत होते. दुचाकी लावून ते घराच्या पायऱ्या चढत होते. त्याचवेळी त्यांच्या मागून एका चोरांना त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेत पळ काढला. मणियार यांनी त्याचा पाठलाग केला. परंतु त्याचवेळी चोराचा पाठलाग करत असलेल्या मणियार यांच्या मागून एका दुचाकीवर बसलेले दोघे आले. त्यांनी मणियार यांच्यापुढे पळणाऱ्या चोराला दुचाकीवर बसविले आणि पसार झाले.

दुचाकीवरून जाताना या तिघा चोरांनी घोडा… घोडा… असा शब्दप्रयोग केला. याप्रकाराने आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी पळत असलेल्या मणियार यांच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत दुचाकीवर बसलेल्या चोरांनी पोबारा केला होता. अतिरीक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. परिसरात असलेल्या सीसीटीव्हीतील चित्रीकरणाची माहिती घेतली. काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरांच्या दहशतीचे चित्रीकरण झाले आहे.

दरम्यान शहरातील वाढत्या चोरी, घरफोडी, दुचाकींच्या चोरींचे प्रमाण वाढले आहे. लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. हे चोरीचे प्रकार नियोजीत असतात. दुसरीकडे पोलिसांकडून जिल्ह्यात लुटमारी करणाऱ्या टोळ्या जेरबंद होत आहे. तरी देखील चोरीचे आणि लुटमारीचे प्रकार थांबलेले नाहीत.

लुटमार करणारे आणि चोरी करणाऱ्यांवर जिल्हा पोलीस दलाने कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा व्यापारी आघाडीने पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अविनाश साखला, नितीन जोशी, योगेश मुथा, लक्ष्मीकांत तिवारी, गौरव गुगळे, राहुल रासकर, पियुष संचेती आदींनी हे निवेदन दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)