आरोपी पपड्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी

कोपरगाव – तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील श्री लक्ष्मी ज्वेलर्स सराफ संगमनेरकर यांच्या दुकानावरील दरोड्याप्रकरणी जेरबंद केलेला संजय उर्फ पपडया उर्फ गणपती काळे याला पत्नी रेखासह न्यायदंडाधिकारी डी पी. कासट यांच्यापुढे हजर केले असता त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.

महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश ,तेलंगणा, उत्तर प्रदेश आदी विविध राज्यातील पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. या दरोडा प्रकरणी आत्तापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. या दरोड्याचा मास्टर माईंड असलेल्या पपड्याचे असलेले नक्षलवादी कनेक्‍शन व विविध राज्यात गुन्हे असल्याने या आरोपीवर पोलिसांची करडी नजर आहे. सहा खुनासह अनेक दरोड्याची गुन्हे त्याच्यावर आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोपरगाव तहसील कार्यालय नव्याने झाले असले तरी दुय्यम कारागृहाची अवस्था दयनीय आहे. याबाबत वेळोवेळी शासनाकडे त्याच्या दुरुस्ती व क्षमतेबाबत पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे मानवाधिकाराच्या अध्यक्षासह अनेक अधिकाऱ्यांनी त्याबाबत पाठपुरावा केला आहे. राहाता, शिर्डी, लोणी, कोपरगाव, बाभळेश्वर असे पाच पोलीस ठाण्याचे आरोपी कोपरगाव येथे आणले जातात.

काही वर्षापूर्वी संतोष वायकर गॅगमधील काही खतरनाक आरोपींनी हे कारागृह फोडून पलायन केले होते, त्यामुळे या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे. सदर खतरनाक आरोपींची गॅग येथे असल्याने पोलिसांच्या झोपा उडून ते दिवसातून पाच वेळा जाऊन आरोपींची तपासणी करीत आहे. 19 ऑगस्टला पडलेल्या दरोड्यानंतर त्याच्या तपासात पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने अनेक गुन्हे नोंदवले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत .त्यातच दोन्ही पोलीस ठाण्यात नव्याने अधिकारी आल्याने कोणाचा प्रसार माध्यमाशी फारसा संपर्क होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)