शहरात वेगवेगळ्या ठिकाणाहून मोबाईल आणि लॅपटॉपची चोरी

नगर  – शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरांनी लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेले आहेत. सुमारे 62 हजार रुपयांचा मुद्देमालावर चोरांनी डल्ला मारला आहे. यात बळजबरीने पाच हजार रुपयांची रक्कम देखील चोरांनी काढून घेली आहे. कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

औरंगाबाद येथील सचिन दत्तात्रय पिंगळे (रा. ठाकरेनगर) यांचा तारकपूर बसस्थानकातून सुमारे 44 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरांनी चोरून नेला. सचिन हे पुणे-औरंगाबाद असा प्रवास करत होते. त्यावेळी चोरांनी त्यांची लॅपटॉपची बॅग नगरमधील तारकपूर बसस्थानकातून लांबवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरमधील चेतन दत्तात्रय अरकल (रा. परदेशीगल्ली) यांनी शितळादेवी गणेश मंडपात चार्जिंगसाठी मोबाईल लावला होता. सुमारे 12 हजार 500 रुपयांच्या मोबाईलवर चोरांनी हातसफाई केली.
बुरूडगाव रोडवरील प्रा. डॉ. विजयकुमार पोपटराव पोटे (रा. शंभुनगर) हे दुचाकीवरून टिळकरोडने घराकडे चालले असताना, त्यांना तीन जणांनी अडवून लुटले. तिघा चोरांनी डॉ. पोटे यांना गंचाडत त्यांच्या खिशातून रोख पाच हजार रुपये आणि मोबाईल काढून घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)