घरात घुसून चोरी करणारा सापडला ढवण वस्तीवर

नगर : ढवणवस्ती येथील विधीसंघर्षग्रस्त मुलाकडून जप्त केलेले नऊ मोबाईल दाखविताना शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम.

विधीसंघर्षग्रस्त बालकाचा प्रताप

नगर  – घरात घुसून मोबाईल चोरी करणारा विधीसंघर्षग्रस्त मुलाला सायबर सेलने तांत्रिक मुद्यावर तपास करत आज पकडले. या मुलाकडून पोलिसांनी 62 हजार रुपयांचे नऊ मोबाईल जप्त केले आहे. ढवणवस्ती येथे राहणारा हा मुलगा घरात घुसून मोबाईल चोरी करत होता. घरात कोणी नसल्याचे पाहून चोरी करायचा. याबाबत पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी तपास केला. चोरी गेलेल्या मोबाईलपैकी काही मोबाईल चालू बंद होत होते. त्याचे लोकेशन नगरमध्ये मिळत होते.

पोलीस निरीक्षक कदम यांनी या तांत्रिक मुद्यावर बारकाईने तपास केला. या चोरीमागे विधीसंघर्षग्रस्त मुलगा असल्याचे आढळून आले. या मुलाला विश्‍वासात घेऊन चौकशी केल्यावर त्याने चोरलेले नऊ मोबाईल पोलिसांना काढून दिले आहेत. या मोबाईलची किंमत सुमारे 62 हजारांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)