शेवगावात गजाने मारहाण करत लाखोंची चोरी

प्रातिनिधिक फोटो

शेवगाव – येथील दादेगाव रस्त्यावरील नाईक वस्तीवर शनिवारी (दि.9) पहाटे 3 च्या सुमारास चार चोरटयांनी लोखंडी गजाच्या सहाय्याने मारहाण करीत एक लाखाची रोख रक्कम व सहा ग्रॅंम सोन्याच्या दोन अंगठया, एक मोबाईल लंपास केला. मारहाणीत एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बाबासाहेब दामोधर नाईक (वय 62, रा. दादेगाव रोड, शेवगाव) हे काल पहाटे 3 च्या सुमारास झोपेतून उठून घराबाहेर आले. त्याच दरम्यान दबा धरुन बसलेल्या चार चोरटयांनी बेसावध असलेल्या नाईक यांच्या डोक्‍यात लोखंडी गजाने मारहाण केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर चोरटयांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून एक लाख रुपयाची रक्कम व हातातील 6 ग्रॅंमच्या दोन सोन्याच्या अंगठया आणि एक मोबाईल लंपास केला. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नाईक यांना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या तपासासाठी आलेल्या श्‍वानपथकाने घटनास्थळापासून काही अंतरावरील पुलापर्यंत माग दाखवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)