वेळ आली, तर शिवसेनेशी युती…

पालकमंत्री प्रा. शिंदे : महापालिका निवडणूक, जिल्हा विभाजनावर ठाम

नगर – महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार आहे. शिवसेनेशी युतीचे वेळ आल्यावर पाहू. शिवसेना सोबत आली, तर ठिकच आहे, अन्यथा भाजप पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढविणार आहे. महापालिकेवर भाजपचीच सत्ता येईल, असा विश्‍वास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी जिल्हा विभाजानाचा ढोल पुन्हा एकदा वाजविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री शिंदे पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री शिंदे म्हणाले, जिल्हा विभाजनाची प्रक्रिया सरकार पातळीवर सुरू आहे. यापूर्वीच्या सरकारच्या पातळीवर विभाजन होणाऱ्या जिल्ह्याच्या मुख्यालयाचा प्रश्‍न होता. मात्र, भाजप सरकार जिल्ह्याच्या मुख्यालयाचा प्रश्‍न सोडवत जिल्ह्याचे विभाजन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी तमाम जिल्ह्यातील नागरिकांची इच्छा असून लोकप्रतिनिधींची मागणी आहे. नगर जिल्ह्याचे विभाजन अटळ असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या 50-54 या लेखाशिर्षाखालील 4 कोटीच्या निधीबाबत नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, यावेळी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मंजूर रेषोच्या प्रमाणात निधी दिलेला आहे. यावरही जि.प.ला निधी कमी पडल्यास निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात दोन टप्प्यात बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना 77 कोटी 55 लाख रुपयाची भरपाई देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील 37 कोटी रुपयांच्या अनुदानाची सरकारकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. नगर शहरात अतिक्रमण विरोधी प्रभावी मोहिम राबविण्यात येत आहे. या पुढे शासकीय कार्यालय समोर अतिक्रमण आढळल्यास संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्हा परिषद अंगणवाडी इमारत आणि शाळा खोल्यांसाठी सध्या मंजूर प्रत्येकी 6 लाख आणि 6 लाख 20 हजार रुपयांचा निधी तोकडा पडत आहे. यामुळे सध्याच्या बाजारातील प्रचलित दरानूसार बांधकाम करण्यास परवानगी देण्याचा ठराव नियोजन समितीत करण्यात आला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

बायपासचे काम रखडल्याने ठेकेदाराला दंड

शहरातील बायपास रोडचे काम रखडल्याने ठेकेदाराला दंड आकरण्यात येणार असून ऑक्‍टोबर अखेर हे कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने बुधवारीच भूजल अधिनियमातील मसुद्यावर हरकती घेण्यासाठी दोन आठवड्याची मुदत वाढ मिळावी, अशी मागणी सरकारकडे केली असल्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी यावेळी सांगितले. खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, आमदार मोनिका राजळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)