नगर (प्रतिनिधी) – शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून करोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठला होता. सलग आठ दिवस रुग्ण संख्या साडेतीन हजारांच्या पुढे होती. मात्र, दोन दिवसांपासून रुग्ण संख्येचा आलेख उतरता आहे. गेल्या चोवीस तासांत दोन हजार 655 जणांना करोनाची बाधा झाली असून, कालच्या पेक्षा आज दोनशेने रुग्ण संख्या घटली आहे.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत करोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. संचारबंदी आणि जमावबंदी करूनही रुग्ण संख्या आटोक्यात येत नव्हती. रुग्ण संख्या वाढीचा अकडा प्रतीदिनी चार हजारांकडे चालला होता.
त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाणही वाढले होते. तर, मृत्यूदरही वाढला होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. साडेतीन हजारांची रुग्ण संख्या आता दोन हजार 655 पर्यंत येऊन पोचली आहे. कालच्या पेक्षा आज रुग्ण संख्या दोनशेने घटली आहे.
ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात रुग्ण संख्या आढळून येत आहे. तालुकानिहाय रुग्ण संख्या अशी ः नगर महापालिका 581, राहाता 301, नगर तालुका 221, राहुरी 218, श्रीगोंदे 161, संगमनेर 148, श्रीरामपूर 144, अकोले 133, पारनेर 117, कोपरगाव 116, नेवासे 113, कर्जत 106, पाथर्डी 97, जाखमेड 86, शेवगाव 71, इतर जिल्हा 24, भिंगार 18.