मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णा हजारेंच्या भेटीला

नगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या मंत्र्यांना सज्जड इशारा दिला होता की ठोस निर्णय झाल्याशिवाय राळेगणला येऊ नये. परंतु तरी देखील ज्येष्ठ समजेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे पुन्हा राळेगणसिद्धी येथे मुख्यमंत्री यांचा निरोप घेऊन आले होते.

मात्र, त्यांनतर आज मंगळवारी उपोषणाच्या सातव्या दिवशी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष भामरे,गिरीष महाजन हे अण्णा हजारेंच्या भेटीसाठी राळेगणसिध्दीमध्ये पोहचले आहेत. त्यांनतर सध्या बंद दारात अण्णासोबत उपस्थित मंत्र्याशी चर्चा चालू असल्याचे कळते आहे.

दरम्यान,  सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, अशी अण्णा हजारे यांनी याआधीच अनेकदा आपली भूमिका मांडलेली आहे. पण त्यांनतर आता खुद राज्याचे मुख्यमंत्री अण्णाच्या मनधारणीला पोहचले असून सध्या चर्चा चालु आहे. त्यामुळे आता, चर्चा पूर्ण झाल्यानंतर नेमके अण्णा काय निर्णय घेणार यासंबंधी कळू शकेल. तसेच खुद मुख्यमंत्री अण्णांच्या भेटीला आल्याने अण्णांच्या आंदोलनाचा विजय झाल्याचं बोलले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.