करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगर शहर भाजप कार्यकारिणीची बैठक
नगर (प्रतिनिधी) – करोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून, शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. पीएम केअरच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाला 50 व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी भाजपच्यावतीने नगर शहरामध्ये उपाययोजना करण्यासाठी शहरातील नामवंत डॉक्टर तसेच आयुर्वेद क्षेत्रातील डॉक्टर यांना एकत्रित करुन काम करणार आहे. त्यासाठी भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांची 11 जणांची कमिटी तयार करुन, नागरिकांना करोना संदर्भात मदत करणार आहेत, असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले.
शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भाजपच्या वतीने विविध उपाययोजना संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, संघटक सरचिटणीस ऍड. विवेक नाईक, ज्येष्ठ नेते सुनील रामदास, वसंत लोढा, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकर, संगिता खरमाळे, सुधीर पगारे, शिवाजी दहिहंडे, मध्यमंडल अध्यक्ष अजय चितळे, भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, केडगाव मंडलअध्यक्ष पंकज जहागिरदार, संतोष गांधी, युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश तवले, प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, सरचिटणीस महेश नामदे, तुषार पोटे, अमोल निस्ताने, पी. डी. कुलकर्णी वंदना पंडित आदी उपस्थित होते. यावेळी महापौर वाकळे म्हणाले की, भाजप पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करोना काळात शहरामध्ये चांगले काम करत आहेत.
कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता, निस्वार्थपणे जनतेला सहकार्य करत आहेत. गेल्या सहा महिन्यामध्ये महानगरपालिकेला सरकारने कुठलीही आर्थिक मदत न करता पालिकेने नागरिकांच्या आरोग्य सुविधेबरोबरच चांगले अन्नछत्र सुरु करून अन्नदान केले. शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून करोना सेंटरची उभारणी केली आहे.