भिंगार-पाथर्डी रस्त्यावर आठ घरफोड्या

 

सात जणांची टोळी, करंजीत सराफाचे दुकान फोडण्याचा प्रयत्न

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भिंगार  – विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये सात जणांच्या टोळीने उच्छाद घालत आठ ठिकाणी चोरी केली. घरफोडीत आठ ठिकाणाहून चोरांनी 3 लाख 22 हजार 251 रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे. भिंगार कॅम्प, कोतवाली व पाथर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंजी (ता. पाथर्डी) येथे सराफाच्या दुकानाचे शटर उचकटत असताना सायरनचा आवाज झाल्याने या टोळीने तेथून पळ काढला.

नगर शहरातील बुरूडगाव रोडवरील अजय भारत गॅस एजन्सीचे कार्यालयाचे कुलूप तोडून या टोळीने 42 हजार 151 रुपयांची रक्कम चोरून नेली. अजय पिसुटे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. यानंतर टोळीने कल्याण विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावरील दुकाने टार्गेट करत तिथे चोरी केली. यानंतर भिंगारच्या कॅम्प हद्दीतील सर्वाधिक सात दुकाने टोळीने फोडत तिथे चोरी केली. बाराबाभळी येथील सचिन कवडे यांचे वाघेश्‍वरी मोबाईल ऍण्ड जनर स्टोअरमध्ये चोरी केली. कवडे यांच्या या दुकानात बॅंक ऑफ महाराष्ट्र अल्ट्रा लहान शाखा देखील आहे. त्याचा कारभार तेखील ते पाहतात. कवडे यांनी शनिवारीच्या दिवसभराची उलाढाल झाल्यानंतर रात्री सव्वाआठ वाजता दुकान बंद केले होते.

दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता त्यांचे चुतले बापू कवडे यांचा सचिन कवडे यांना फोन आला. दुकानाचे शटर तोडलेले असून, ते अर्धवट उघडे आहे. यानंतर सचिन कवडे यांनी दुकानाकडे धाव घेत आतमध्ये चौकशी केल्यावर बॅंकेच्या काउंटरमधून 15 लाख व मोबाईल शॉपीच्या काउंटरमधून 12 हजार रुपये, लॅपटॉपची हार्ड डिस्क चोरीला गेल्याचे समोर आले.

दीपक कवडे यांचे वाघेश्‍वरी हाडवेअर व फॅब्रिकेशन्समधून 35 हजार, शिवाजी शिंदे यांच्या बाराबाभळी येथील वाघेश्‍वरी किरणा दुकानातून 13 हजार, रघुनाथ बन्सी घुले यांच्या वडारवाडीतील आनंद ट्रेडिंगमधील 11 हजार, शेख आरीफ अब्दुल यांचे भिंगारच्या शुक्रवार बाजार तळावरील गुलजार सायकल व गुलजार ट्रेडर्समधून 49 हजार 600 रुपये, रियाजुद्दीन शमशुद्दीन यांचे आर. आर. ट्रॅव्हल्सच्या दुकानातून पाच हजार रुपये, दिनेश सुरेश हजारे यांच्या गुरूप्रसाद किराणा स्टोअर्स या दुकानातून साडेचार हजार रुपये आणि रवी गोटुलाल गोहेर यांच्या शुक्रवार बाजारतळावरील भावना इलेक्‍ट्रीकल दुकानाचे शर्टर उचकाटून उचकापाचक केली.

भिंगार कॅम्प हद्दीतून चोरांनी सुमारे 2 लाख 80 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही टोळी नगर शहरातून चोरी करत कल्याण विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावरील करंजी (ता. पाथर्डी) पर्यंत चोरी करत सुटली होती. करंजीतील सराफ व्यावसायिक प्रफुल्ल नवनीतलाल गांधी (वय 40) यांचे कलेक्‍शन ज्लेवर्स दुकानात चोरीचा प्रयत्न केला. शर्टर उचकटत असताना सायरन वाजल्याने टोळीने तेथून धूम ठोकली.

तीन दुचाकींवर सात जणांची टोळी

कल्याण विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर वावरत असताना या टोळीने करंजी (ता. पाथर्डी) येथे सराफाच्या दुकान फोडण्याचा प्रयत्न केला आहे. या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरा होता. यात टोळीचे चित्रीकरण झाले आहे. त्याचबरोबर जिथे-जिथे चोरी केली आहेत. त्यातील बहुतांशी ठिकाणी ही टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी हे चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. हातात कटावनी, तोंडी मफलरने झाकलेली आणि टोक्‍यावर टोपी, अशा पेहरावत ही टोळी आहे.

“सीसीटीव्हीचे चित्रीकरण बारकाईने तपासले आहे. सात जणांची ही चतुर टोळी आहे. ओळख लपविण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे. तरी देखील टोळीविषयी बरीच काही माहिती हाती लागली आहे. त्यानुसार पथक तैनात करून टोळीच्या शोधासाठी रवाना केले आहे.
– संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)