2014 मध्ये भाजपने माझा वापर केला – अण्णा हजारे

नगर – राळेगणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यात सुरुवातीलाच 2014मध्ये भाजपने माझा वापर केला असं वक्तव्य अण्णा हजारे यांनी केलं आहे.

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णांची भेट घेतली त्यांनतर पत्रकार परिषदेत पुढे बोलताना अण्णा म्हणाले की, आणखी पाच दिवस मला काही होणार नाही. त्यामुळे आणखी पाच दिवसांनी मी उपोषणाबाबत विचार करेल. जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणारं. उपोषणांशिवाय अन्य मला दुसरा मार्ग नाही.

राज ठाकरे विषयी तुमची काय चर्चा झाली हे विचारले असता अण्णा म्हणाले की, राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली आणि तब्येतीची चिंता व्यक्त करत उपोषण सोडा असे सांगितले.

केजरीवाल यांच्याविषयी विचारले असता अण्णा म्हणाले, भाजप आणि आप हे लोकपाल आंदोलनामुळे सत्तेत आले आहेत. भाजपनं माझा वापर केला हे खरचं आहे. सरकार माझ्या मनातून उतरलं आहे. केजरीवाल भेटायला आले तर त्यांचे स्वागत पण स्टेजवर येऊ देणार नाही.

मंत्र्यांवर आमचा विश्वास नाही. 90 टक्के मागण्या मान्य झाल्या हे धादांत खोटं आहे. केंद्रातील मंत्री यांनी मला  भेटायला येऊ नका, तुमच्या येण्यानं नागरिकांत संभ्रम होतो. तुम्ही ठोस निर्णय घ्या, नुसती चर्चा नको. शेतकऱ्यांच्या मागणीबदल काय झाल तेही सांगा. यावेळी मागण्यांबद्दल कोणताही निर्णय लेखी स्वरुपात द्या अशी मागणीही अण्णांनी केली. दरम्यान, सत्ता बदलून फायदा नाही तर त्यासाठी व्यवस्था बदलणं आवश्यक असल्याचं अण्णा हजारे म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.