‘पिकअप’ उलटून 20 मजूर जखमी

अकोले – लोहोटे वस्ती जवळ आज सकाळी दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप उलटून झालेल्या अपघातात 20 जण मजूर जखमी झाले. या पिकअपने तीन पलट्या खालल्या. त्यात 4 गंभीर झाले असून इतर 16 जणांची प्रकृती काळजी वाटावी अशी बनली आहे. आमदार वैभवराव पिचड यांच्या तातडीच्या मदतीमुळे व आरोग्य विभागाला त्यांनी दिलेल्या आदेशामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

आज सकाळी निंब्रळ, विठा व पाडाळणे येथील मजूर घेवून एक पिकअप अकोलेकडे येत होती. ही पिकअप लोहोटेवस्ती जवळ आली असतांना एक दुचाकी आडवी आली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात या मजूर वाहक पिकअपने तीन-चार पलट्या खाल्या. त्यात असणारे मजूर जखमी झाले. या घटनेच्या वेळीच राजूर येथून अकोलेकडे निघालेले आ. वैभवराव पिचड यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी आपले पक्षीय सहकारी पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, युवकचे अध्यक्ष शंभू नेहे, अकोलेचे नगरसेवक सचिन शेटे आदींनी तातडीने त्या सर्वाना मदत केली.शिवाय ग्रामीण रुग्णालयाशी आ.पिचड यांनी संपर्क साधून रुग्णावाहिका बोलावून या पिकअपमध्ये जखमी उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वाहनाला सावंत यांची दुचाकी आडवी गेल्याची चर्चा आहे. मात्र या दुचाकीच्या जखमीलाही त्यांनी मदत केली. जखमीपैकी 4 जण गंभीर जखमी आहेत. असे पाहिल्यावर अकोले ग्रामीणचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बाळासाहेब मेहेत्रे यांनी पुढील उपचारासाठी संगमनेर येथे पाठवले.त्यात एका 10 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मान, पाठ व मेंदू यांना मार बसला असल्याची माहिती डॉ. मेहेत्रे यांनी पत्रकारांना दिली. ताईबाई नवनाथ मेंगाळ (वय35), सोन्याबाई नारायण मेंगाळ (वय 30), लता भागवत कडाळी (वय 30 सर्व राहाणार निंब्रळ), केशव रामनाथ मुठे (वय 10, रा. पाडाळणे) या सर्व गंभीर जखमींना संगमनेर येथे हलवले गेले.

अकोले येथे उपचार घेणारे जखमी पुढीलप्रमाणे- ताराबाई अशोक पथवे, सखुबाई भाऊ पथवे, सनू बाळू मेंगाळ, रवींद्र लक्ष्मण गांगड, प्रवीण भाऊराव सावंत, सलोनी रामनाथ मधे, संतोष बाळू मेंगाळ, प्रियांका बाळू मेंगाळ, मधू सुभाष मेंगाळ, लक्ष्मण संतू गांगड, नामदेव गंगाराम उघडे, रामनाथ गोविंद मधे, जाईबाई पंढरीनाथ मेंगाळ, सानिका रामनाथ मधे, सोनाबाई नामदेव उघडे, कार्तिक रामनाथ मधे, सीमा प्रदीप सावंत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)