अकोल्यात 21 पैकी 17 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे

अकोले – अकोले तालुक्‍यात 21 ग्रामपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तालुक्‍याचे भाग्यविधाते माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली 17 ग्रामपंचायत निवडणुकीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने झेंडा फडकवला आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा निकाल राष्ट्रवादीलाच अनुकूल असल्याचे सिध्द झाले. याचे आम्ही स्वागत करतो, असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव व सचिव यशवंतराव आभाळे यांनी सांगितले.

अकोले तालुक्‍यातील आदिवासी भागातील 19 ग्रामपंचायती व प्रवरा पट्टयातील 2 अशा एकूण 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी पाचनई ग्रामपंचायत बिनविरोध होवून सरपंचपदी राष्ट्रवादीच्या पार्वताबाई घोगरे याची निवड झाली. आज सर्व 20 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुसंडी मारत आदिवासी भागातील 19 पैकी 16 तर प्रवरा पट्टयातील 2 पैकी 1 अशा 17 ग्रामपंचायतींमध्ये निर्विवाद बहुमत मिळवत राष्ट्रवादीचे वर्चस्व सिध्द केले आहे.या ग्रामपंचायत निवडणूक विरोधी पक्षांनी प्रतिष्टेची केली होती. त्यांनी मतदारांच्या दारोदारी फिरत भूलथापा मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र मतदाराने या विरोधकांच्या भुलथापांना न फसता पुन्हा एकदा तालुक्‍याचे भाग्यविधाते माजीमंत्री पिचड व आ. पिचड यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडुन आलेले गावनिहाय सरपंच पुढीलप्रमाणे पाचनई ग्रामपंचायतीची सरपंचपदी राष्ट्रवादीच्या पार्वताबाई घोगरे या बिनविरोध, संपत रामचंद्र झडे (रतनवाडी), सखाराम भदु उंबरे (मुतखेल), सोमनाथ लक्ष्मण वाळेकर (वांजुळशेत/ पुरुषवाडी), हिरामण चिंधू भांगरे (कोहणे), अंजना भगवंता भांगरे (पिंपळदरावाडी), जनाबाई रवीन्द्र खाडे (जहागिरदारवाडी), मंदाताई शंकर कुलाळ (पेढेवाडी), मंजुळा भगवंता खोकले (पाचपट्टावाडी), संगीता रमेश गोडे (तिरडे/ शिवाजीनगर), सयाजी तुकाराम अस्वले (कुमशेत), विमल परशुराम पदमेरे (पेंडशेत), द्रौपदा धोंडू भांगरे (शिसवद), तुकाराम सोमा खाडे (बारी), चंद्रप्रभा मारुती बांडे (साम्रद), नारायण तुकाराम जाधव (कोकणवाडी), नाना शंकर जाधव (सुगांव बु).

निवडून आलेल्या सर्व सरपंच व सदस्यांनी निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेतल्यानंतर सर्व सरपंच व सदस्यांचा माजी मंत्री श्री पिचड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती कैलासराव वाकचौरे, सचिव यशवंतराव आभाळे, अगस्ति साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे, आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरतराव घाणे, युवानेते विजय भांगरे, नंदाताई धुमाळ, आशाताई पापळ प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष गुलाल उधळत व फटाक्‍यांची आतषबाजी करत साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)