नगर : जिल्ह्यातील 73 हजार 765 रुग्णांची करोनावर मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93 टक्के

नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 178 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 73 हजार  765 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.93 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 219 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 191 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 73, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 144 आणि अँटिजेन चाचणीत 2, रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 31, जामखेड 3, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 1, पारनेर 3, संगमनेर 15, शेवगाव 7, श्रीगोंदा 8, अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 13, अकोले 9, कर्जत 3, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 10, नेवासे 3, पारनेर 3, पाथर्डी 2, राहाता 17, राहुरी 2, संगमनेर 26, शेवगाव 5, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 7 आणि इतर जिल्हा 6, अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत आज 2 जण बाधित आढळून आले. नेवासे 1, राहाता 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 53 अकोले 1, जामखेड 5, कर्जत 3, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 13, नेवासे 2, पारनेर 29, पाथर्डी 6, राहाता 19, राहुरी 3, संगमनेर 15, शेवगाव 2, श्रीगोंदा 9, श्रीरामपूर 8 आणि इतर जिल्हा 4, अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्णसंख्या:73765

उपचार सुरू असलेले रुग्ण: 1191

मृत्यू:1144

एकूण रुग्णसंख्या:76100

करोना नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड

धार्मिकस्थळी व सार्वजनिक ठिकाणी करोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. सोमवारपासूनच याची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

धार्मिक ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, धुम्रपान न करणे, परिसरात न थुंकणे या नियमांचे उल्लंघन करणारास 100 रुपये इतका दंड होता. मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने धार्मिक स्थळांच्या ठिकाणी नियमांचे पालन करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.