Naga Chaitanya | Sobhita Dhulipala : अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला त्यांच्या लग्नामुळे सध्या खूपच आनंदी आहेत. शोभिता धुलीपालाच्या आधी नागा चैतन्यचा विवाह अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी झाला होता. दोघांनी प्रेमविवाह केला होता.
पण 2021 हे वर्ष सामंथा आणि नागा यांच्या चाहत्यांना धक्का देऊन गेले. वास्तविक सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोटाची घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या नात्याबद्दल माहिती दिली होती.
समंथा आणि नागा हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपे होते. मात्र, 2021 मध्ये हे दोघे विभक्त झाले. त्यानंतर 4 डिसेंबर 2024 मध्ये नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी दुसरे लग्न केले.
नागा चैतन्यने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले होते. नागा चैतन्यचे आजोबा अक्किनेनी नागेश्वर राव यांनी स्थापन केलेल्या हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्यांचा विवाह सोहळा झाला. त्यांनी दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले आहे.
View this post on Instagram
पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत नागा चैतन्यने पत्नी शोभिताच्या काही सवयींवर आक्षेप घेतला असून नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी या जोडप्याने आपल्या नवीन आयुष्यातील अनेक गंमतीशीर किस्से सर्वांशी शेअर केले.
यावेळी त्यांना विचारण्यात आलं की दोघांपैकी कोण चांगलं स्वयंपाक करतं आणि त्याचा आवडता पदार्थ कोणता? तेव्हा नागा चैतन्य म्हणाला की त्यांच्यापैकी कोणीही स्वयंपाक करत नाही.
तेव्हा शोभिता म्हणाली की, नागा तिला दररोज रात्री हॉट चॉकलेट बनवून देतो. त्यावर नागा चैतन्यने लगेच म्हटलं की “हे स्वयंपाक नाहीये. हॉट चॉकलेट, कॉफी, हे सर्व स्वयंपाक नाहीये”.
त्यानंतर चित्रपटांबद्दल विचारले असता, नागा चैतन्य म्हणाला की शोभिताला चित्रपट पाहण्याची गरज आहे. जेव्हा शोभिता म्हणाली की ती त्याच्याच चित्रपटांपासून सुरुवात करेल, तेव्हा चैतन्यने हसत नाही म्हणत तिला दुसरे कोणतेही चित्रपट पाहण्यास सांगितले.
जेव्हा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाला विचारण्यात आलं की दोघांपैकी कोण जास्त रोमँटिक आहे, तेव्हा दोघांनीही सांगितलं की नागा चैतन्य जास्त रोमँटिक आहे तर शोभिता प्रेरणादायी आणि मजेदार गोष्टी बोलते.
नागाने असेही सांगितले की शोभिताला गाडी चालवता येत नाही. शोभिता म्हणाली, “मी गाडी चालवत नाही. मी फक्त लोकांना गाडी चालवायला वेडं करते.” अशा अनेक गंमतीदार गोष्टी यावेळी या जोडप्याने सर्वांशी शेअर केल्या.
नागा चैतन्यच्या शोभितासोबतच्या अफेअरची चर्चा सुरु झाली….
नागा चैतन्यने शोभितापूर्वी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केले होते. या दोघांचे लग्न 2017 मध्ये झाले होते. पण, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून विभक्त होण्याची घोषणा केली होती.
आणि चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. घटस्फोटानंतर काही वेळातच नागा चैतन्यच्या शोभितासोबतच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आणि त्याने ऑगस्ट 2024 मध्ये साखरपुडा करत चाहत्यांना मोठा धक्का दिला.