Nafe Singh Rathee Murder। नफे सिंग राठी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालंय. राठी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सौरव आणि आशिष अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. झज्जर पोलीस, दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि हरियाणा एसटीएफ यांच्या संयुक्त कारवाईनंतर या दोन आरोपींना गोव्यातून पकडण्यात आलं. हे दोन्ही आरोपी कपिल सांगवान उर्फ नंदू टोळीशी संबंधित आहेत.
आणखी दोघांचा शोध सुरु Nafe Singh Rathee Murder।
नफे सिंग राठी हत्याकांडातील आणखी दोन शूटर्सचा पोलिस अजूनही शोध घेतायत. या घटनेत ४ आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झालंय. हे सर्व शूटर कपिल सांगवान उर्फ नंदू टोळीशी संबंधित आहेत. गँगस्टर कपिल सांगवान उर्फ नंदू सध्या लंडनमध्ये आहे. या प्रकरणी दोन्ही शूटर्सच्या अटकेबाबत झज्जर पोलीस आज पत्रकार परिषदही घेण्याची शक्यता आहे.
Haryana INLD chief Nafe Singh Rathee murder case | Two shooters namely Saurav and Ashish nabbed from Goa in a joint operation by Jhajjar Police, Delhi Police Special Cell and Haryana STF. Search underway to nab two more shooters: Jhajjar Police
— ANI (@ANI) March 4, 2024
दरम्यान, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी याविषयी, नफे सिंग राठी यांच्या हत्येतील आरोपींना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिलंय. हरियाणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. झज्जरचे एसपी डॉ अर्पित जैन यांनीही सांगितले की, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, ज्यांच्यावर पोलिसांना संशय आहे त्यांची चौकशी केली जात आहे.
INLD प्रमुखाची हत्या झाली Nafe Singh Rathee Murder।
25 फेब्रुवारी रोजी INLD च्या हरियाणा युनिटचे अध्यक्ष नफे सिंग राठी आणि पक्षाचे कार्यकर्ता जयकिशन यांची अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली होती. या घटनेपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एकीकडे विरोधक सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर दुसरीकडे पोलीस आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या क्रमवारीत दोन शूटर्सना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, इतरांच्या शोधात पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहेत.