नदिमचा असाही विक्रम

रांची: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचला होता. भारतीय संघाने पहिल्या डावात 497 धावा केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑनचे संकट ओढावण्याची शक्‍यता होती. अन्‌ संघाकडून पहिलीच कसोटी खेळणाऱ्या शाहबाज नदीमने पहिला बळी घेतला.

सुरुवातीच्या धक्‍क्‍यानंतर जुबेर हमजा आणि थेम्बा बऊमा यांच्यात 91 धावांची भागीदारी झाली. रवींद्र जडेजाने हमजाला माघारी पाठवल्यानंतर पुढच्याच षटकात शाहबाज नदीमने थेम्बा बऊमाचा बळी घेतला.

नदीमच्या गोलंदाजीवर वृद्धिमान साहाने बऊमाला यष्टीचीत केले. आपला पहिलाच बळी यष्टीचितच्या माध्यमातून घेणारा शाहबाज नदीम हा चौथा भारतीय गोलंदाज ठरला.

याआधी डब्ल्यू वीरनने कोर्टनी वॉल्शला, वेंकटरमन यांनी डेसमंड हेन्सना आणि आशिष कपूरनी कार्ल हूपरला बाद केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.