नवी दिल्ली : भाजपच्या अध्यक्षपदी सोमवारी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जे पी नड्डा यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून पदभार स्वीकारला.
Jagat Prakash Nadda elected unopposed as the National President of Bharatiya Janata Party (BJP) pic.twitter.com/ek5PlEZ2sE
— ANI (@ANI) January 20, 2020
सोमवारी सकाळी त्यांनी भाजपच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्याविरोधात कोणीच उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जे पी नड्डा जून २०१९ पासून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. २०१९ मध्ये अमित शहा यांच्याकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड कारण्यातर आली होती.