फेडररला मागे टाकून नदाल पुन्हा अग्रस्थानी

एटीपी टेनिस पुरुष विश्‍वक्रमवारी
पॅरिस: विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत नोव्हाक जोकोविचकडून पराभूत झाल्यानंतरही स्पेनच्या राफेल नदालने एटीपी विश्‍वक्रमवारीत पुन्हा एकदा अग्रस्थान मिळविले आहे. इतकेच नव्हे तर 17 ग्रॅंड स्लॅम विजेत्या नदालने आपला नजीकचा प्रतिस्पर्धी आणि 20 ग्रॅंड स्लॅम विजेत्या रॉजर फेडररवर 2030 गुणांची भरीव आघाडीही मिळविली आहे.

विम्बल्डन स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत केविन अँडरसनविरुद्ध पाच सेटच्या प्रदीर्घ लढतीनंतर पराभूत झाल्यामुळे रॉजर फेडररने विश्‍वक्रमवारीतील अग्रस्थान गमावले असले, तरी तो दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या क्रमांकावरील अलेक्‍झांडर झ्वेरेव्हपेक्षा तो 1415 गुणांनी आघाडीवर आहे. दरम्यान विम्बल्डन विजेतेपद पटकावणाऱ्या नोव्हाक जोकोविचने मोठी झेप घेतली असून थेट अव्वल 10 क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. तसेच विम्बल्डन उपविजेत्या केविन अँडरसनने या मानांकन यादीत पाचव्या स्थानावर झेप घेतली असून त्याच्याकडून उपान्त्य फेरीत पराभूत झालेल्या जॉन इस्नरनेही नवव्या क्रमांकाची निश्‍चिती केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एटीपी मानांकन यादी-
1) राफेल नदाल (स्पेन- 9310 गुण),
2) रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड- 7080 गुण),
3) अलेक्‍झांडर झ्वेरेव्ह (जर्मनी- 5665 गुण),
4) युआन मार्टिन डेल पोट्रो (अर्जेंटिना- 5395 गुण),
5) केविन अँडरसन (दक्षिण आफ्रिका- 4655 गुण),
6) ग्रिगोर दिमित्रोव्ह (बल्गेरिया- 4610 गुण),
7) मेरिन सिलिच (क्रोएशिया- 3905 गुण),
8) डॉमिनिक थिएम (ऑस्ट्रिया- 3665 गुण),
9) जॉन इस्नर (अमेरिका- 3490 गुण),
10) नोव्हाक जोकोविच (सर्बिया- 3355 गुण).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)