नवी दिल्ली : राष्ट्रीय उत्तेजक द्रव सेवन विरोधी एजन्सीच्या (नाडा) शिस्तपालन समितीने भारताचा भालाफेकपटू अमित दाहियावर चार वर्षांची बंदी घातली आहे.
National Anti-Doping Agency: Javelin thrower Amit Dahiya has been penalised for intentionally evading sample collection&trying to cheat anti-doping officials during the 2nd National Javelin Throw Open Championship 2019 held at Sports Authority of India Center, Sonipat (Haryana).
— ANI (@ANI) February 17, 2020
अमितने ‘डोम सॅम्पल’साठी आपल्या जागी दुस-या खेळाडूला पाठविले होते. हरियाणाच्या अमितने गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेत ही करामत केली होती. त्यामुळे अमितवर ही कारवाई करण्यात आली आहे.
In a landmark decision by the National Anti Doping Agency, javelin thrower Amit Dahiya has been penalised with intentionally evading sample collection & trying to cheat anti-doping officials during the 2nd National Javelin Throw Open Championship 2019 held at SAI Center, Sonipat. pic.twitter.com/FNZebkJJ3T
— NADA India (@NADAIndiaOffice) February 17, 2020
हरियाणातील सोनीपत येथे १६ एप्रिल २०१९ रोजी राष्ट्रीय स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत अमितने ६८.२१ मी भाला फेकत तिसरे स्थान पटकावले होते. यानंतर अमितला डोप सॅम्पल साठी बोलाविण्यात आले होते. मात्र, अमितने आपल्या जागी दुस-या खेळाडूला पाठविले होते.