बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनकडे सध्या अनेक बिग बजेट चित्रपटांची रांग लागली आहेत. त्यातच तो आता डिजिटल डेब्यूही करण्यास सज्ज झाला आहे. ब्रिटिश वेबसीरीज “द नाइट मॅनेजर’च्या हिंदी रीमेकच्या माध्यमातून रितिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर एंट्री करणार असल्याचे समजते.
या वेब सीरिजमध्ये रितिक रोशनसोबत साउथ अभिनेत्री नाभा नतेश झळकणार आहे. नाभा नतेशदेखील या वेब सीरिजमधून डिजिटल डेब्यू करणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. परंतु हृतिक रोशन आणि नाभा नतेश यांची नवीन जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे.
साउथ इंडस्ट्रीमध्ये नाभा नतेशची जबदरस्त फॅन फॉलोइंग आहे. नाभाने “आय स्मार्ट शंकर’ आणि “डिस्को राजा’ यासारख्या काही हिट चित्रपटांमध्ये झळकली आहे. तिने आपल्या अभिनयासह हॉट अदांनी चाहत्यांवर भुरळ घातली आहे.
दरम्यान, या सीरिजचे शूटिंग वर्षाअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. या सीरिजची निर्मिती बनिजय आशिया प्रोडक्शन हाऊसद्वारा करण्यात येणार आहे. ही सीरिज डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होऊ शकते.