Bank Strike : नाबार्ड बॅंकेचे कर्मचारी संपावर

नवी दिल्ली- नॅशनल बॅंक फॉर अग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट( नाबार्ड) च्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी एक दिवसाचा संप केला.

20 वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचे फेरमूल्यांकन करण्यात आलेले नाहीत. ते करण्यात यावे अशी मागणी नाबार्डच्या कार्यरत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे.

रिझर्व बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचे फेरमूल्यांकन 2012 मध्ये करण्यात आले. मात्र नाबार्डच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे 2001 पासून दुर्लक्ष करण्यात येत आहे, असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.