मुंबई – दरवर्षी प्रमाणे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमी वर येत असतात पण गेल्या दोन वर्षांत कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे आपण सर्वांनी राज्य सरकारच्या नियमांचे पालन करून डॉ. बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन केले.
याही वर्षी ‘ओमायक्राॅन’ नावाचा विषाणू फैलत आहे. त्यामुळे सर्व भीमसैनिकांनी कोठेही गर्दी न करता घरातूनच दूरदर्शन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी केले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) निमित्त अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीचे ऑनलाईन प्रक्षेपण खालील नमूद लिंकवर पाहता येईल.
यूट्यूब: http://bit.ly/6december21YT
फेसबुक: http://bit.ly/6december21FB
ट्विटर: http://bit.ly/6december21TT
दरम्यान, दरवर्षी 6 डिसेंबर रोजी दादरच्या चैत्यभूमीवर महामानवास अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटतो. पण कोरोनाची साथ आल्यापासून महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादनावर काहिशा मर्यादा आल्यात. यंदाही शासनाने पूर्ण बंदी घातलेली नाही पण कोरोनाच्या लसीचं प्रमाणपत्र बाळगणं मात्र अनिवार्य केलं आहे.