एन. चंद्रशेखरन्‌ यांचे काम उत्तम : रतन टाटा 

मुंबई: एन. चंद्रशेखरन्‌ यांच्या नेतृत्वाखाली सध्या टाटा समूहातील सर्व कंपन्यांची वाटचाल योग्य प्रकारे चालली आहे, असे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी सांगितले. समूहातील सर्व कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक दरवर्षी 29 जुलै रोजी म्हणजे जे आर डी टाटा याच्या जयंती दिवशी होत असते. या बैठकीत चंद्रशेखरन्‌ यांनी सर्व कंपन्यांच्या कामकाजाची माहिती दिली. त्यानंतर टाटा यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आणि सध्याच्या नेतृत्वाच्या हातात टाटा समूह सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 
टाटा समूहाचे मुख्यालय बॉंम्बे हाऊस या इमारतीत आहे. या इमारतीचे नूतनीकरण गेल्या नऊ महिन्यांपासून चालू होते. आता नव्या इमारतीचे उद्‌घाटन रतन टाटा यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीत होणाऱ्या कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना परस्पराच्या संपर्कात राहता येणार असल्याचे सांगण्यात आले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)