वॉशिंग्टन – नासाने अंतराळात मंगळ मोहिमेसाठी पाठवलेले ऑर्बिटर सतत चांगली छायाचित्रे पाठवत असते आता आर्बिटरने नुकत्याच पाठवलेल्या काही छायाचित्रांमुळे शास्त्रज्ञ हैराण झाले आहेत या छायाचित्राप्रमाणे मंगळाच्या पृष्ठभागावर काही भेगा दिसत असून तेथून काळानिळा धूर बाहेर येत असल्याचेही दिसत आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळावरसुद्धा पृथ्वीप्रमाणे चार ऋतू असतात सध्या मंगळावरील थंडीचा मोसम संपला आहे आणि उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे त्यानंतर ऑर्बिटरने जी छायाचित्रे घेतली आहेत त्यामध्ये अशा भेगा मंगळाच्या पृष्ठभागावर दिसू लागल्या आहेत एखाद्या मानवी आकृतीचे अनेक हात असावेत अशा प्रकारचे ते छायाचित्र आहे एवढेच नाही.
तर या भेगांमधून काही वेळा काळा आणि निळा धूर बाहेर येता नाही दिसत आहे शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे या भेगा म्हणजे बर्फ असू शकते आणि तेथील थंडीचा मोसम संपल्याने जो नैसर्गिक वायू तयार झाला आहे त्या वाफा बाहेर येऊ लागल्याने निळा काळा धूर दिसत असावा.