वॉशिंग्टन – अमेरिकेने म्यानमारच्या दहा आजी आणि माजी अधिकाऱ्यांवर निर्बंध लागू केले आहेत. तसेच म्यानमार मधील तीन संस्थांवरही त्यांनी तातडीने निर्बंध लागू केले आहेत. म्यानमार मध्ये लष्कराने सत्ता ताब्यात घेऊन तेथील लोकशाहींवादी नेत्यांना अटक केली आहे.त्या कृतीच्या विरोधात अमेरिकेने ही कारवाई केली आहे.
आज ज्यांच्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत त्यातील सहा अधिकारी लष्करी क्रांतीला थेट जबाबदार आहेत. त्यात म्यानमारच्या लष्कर प्रमुखांचाहीं समावेश आहे. म्यानमार रूबी एन्टरप्राईजेस, म्यानमार इम्पिरियल जेड कंपनी आणि कांक्री कंपनी या तीन कंपन्यांवरही निर्बंध लागू झाले आहेत.
अमेरिकेचे विदेश मंत्री टोनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे की, म्यानमारच्या लष्कराने सर्व संकेत पायदळी तुडवून तेथील मानवाधिकाराचे हनन केले असून लोकनियुक्त सरकार उलथून टाकण्याची त्यांची ही कृती भीषण आहे.