माझा उपचार प्रचंड थकवणारा आहे: ऋषी कपूर

ऋषी कपूर हे सध्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते अमेरिकेत उपचार घेत आहे. आपल्या आजाराबद्दल प्रथमच त्यांनी एका मुलाखतीत माहिती दिली. माझ्या तब्येतीत आधीपेक्षा बरीच सुधारणा आहे. मी आणखी काही दिवस कामावर परतू शकणार नाही. उपचार अद्यापही सुरु आहेत.

या आजारापणातून लवकरच बाहेर येईल, अशी आशा करतो. परमेश्वराची कृपा राहिली तर लवकरच कामावरही परतेल, असे ऋषी कपूर म्हणाले. माझा उपचार प्रचंड थकवणारा आणि दीर्घकाळ चालणारा आहेत. यासाठी संयम लागतो आणि दुदैवाने माझ्या स्वभावात तोच नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरुवातील कपूर कुटुंबाने ऋषी कपूर यांच्या आजारपणाबाबत निव्वळ अफवा असल्याचे सांगत बातमीचे खंडन केले होते. पण अलीकडे नीतू सिंह यांच्याच एका पोस्टनंतर पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. न्यु ईअर सेलिब्रेशनचा एक फोटो नीतू सिंग यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला होता. आई कृष्णा कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारारालाही ऋषी कपूर उपस्थित राहू शकले नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)