आमदार दत्तात्रय भरणे : इंदापुरात गुणवंत शिक्षकांचा सन्मान
रेडा – लहानपणी जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना तिसरीचे शिक्षण घेतले नसून, जिल्हा परिषेदेच्या शिक्षकाने मला दुसरीमधून थेट चौथीच्या वर्गामध्ये माझ्यामधील गुणवत्ता पाहून प्रवेश दिला. माझे प्रमोशन केले. तेव्हापासून आजपर्यंत प्रमोशन सुरूच आहे, असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर येथे कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा व पुणे जिल्हा परिषद, इंदापूर पंचायत समिती शिक्षण विभागांच्या वतीने तालुकास्तरिय शिक्षण परिषद 2019 चे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, साहित्यिक डॉ. संजय कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, संपतराव पवार, दत्तात्रय तोरसकर, सारिका भरणे,नगरसेवक श्रीधर बाब्रस, सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटील मान्यवर उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, अमोल भिसे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. My promotion from a young age to a teacher